शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

जलाशये तहाणलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 22:03 IST

सरारसरी पावसाच्या तुलनेत यावर्षी २६ टक्के पाऊस कमी पडला आहे. त्यातही एटापल्ली व भामरागड हे दोन तालुके वगळले तर काही तालुक्यांमध्ये ६० ते ७० टक्के दरम्यान पाऊस झाला आहे.

ठळक मुद्देसरासरीच्या ७४ टक्के पाऊस : तलावांमध्ये निम्म्यापेक्षाही कमी पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सरारसरी पावसाच्या तुलनेत यावर्षी २६ टक्के पाऊस कमी पडला आहे. त्यातही एटापल्ली व भामरागड हे दोन तालुके वगळले तर काही तालुक्यांमध्ये ६० ते ७० टक्के दरम्यान पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्हाभरातील अनेक जलाशये कोरडी आहेत. धानाचे पीक निघण्यास आणखी दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. यापुढचे दोन महिने पुरेसा पाऊस न झाल्यास धान पीक धोक्यात येऊन दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.गडचिरोली जिल्ह्यात धान पिकाचे मुख्य उत्पादन घेतले जाते. जवळपास दीड लाख हेक्टरवर धान पिकाची लागवड केली जाते. धान पिकाला धानाच्या रोवणीपासून तर शेवटपर्यंत पावसाची गरज भासते. धानाला शेवटपर्यंत पाणी देण्यासाठी मामा तलाव, गाव तलाव, बोड्या बांधण्यात आल्या आहेत. पावसाचे पाणी या तलावांमध्ये साचविले जाते. सप्टेंबरनंतर पावसाचे प्रमाण कमी होते. कडक ऊन पडण्यास सुरूवात होत असल्याने शेतकरी धान पिकासाठी तलावातील पाण्याचा उपयोग करतात. त्यामुळे धानाचे पीक निघण्यासाठी तलाव भरले असणे आवश्यक आहे. मात्र यावर्षी पुरेशा प्रमाणात पाऊस झाला नाही. मध्यंतरी पावसाअभावी रोवणीचे कामे थांबली होती. त्यावेळी शेतकºयांनी तलाव फोडून रोवणी केली होती. त्यामुळे तलावात साचलेला जलसाठा आणखी कमी झाला. काही तलाव आता ३० ते ४० टक्केच भरली आहेत. एवढ्या पाण्याच्या भरवशावर शेवटपर्यंत धान पिकाला पाणी पुरविणे अशक्य असल्याने शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे दिसून येत आहे.यावर्षी पावसाने अगदी सुरूवातीपासून हुलकावणी देण्यास सुरूवात केली. त्यामुळे धानाच्या रोवणीची कामे आॅगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत चालली. धानाचे पºहे टाकल्यानंतर ३० दिवसांच्या आत रोवणी झाल्यास धानाची वाढ होण्यास पुरेसा कालावधी उपलब्ध होतो व उत्पादन मिळते. मात्र यावर्षी पावसाने दगा दिल्याने धानाच्या रोवणीची कामे लांबली आहेत. परिणामी धानाच्या उत्पादनातही कमालीची घट येण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात पाऊस झाला नाही तर तलावातील पाणी संपून धान पीक करपण्याचा धोका आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे दिसून येत आहे.रेगडी तलावात ६१ टक्केच जलसाठाचामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील तलाव हा गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठा तलाव आहे. या तलावाच्या माध्यमातून जवळपास ४० किमी अंतरावरील शेतीला जल सिंचनाची सुविधा उपलब्ध होते. त्यामुळे चामोर्शी तालुक्यातील शेतकºयांचे लक्ष या तलावाकडे लागून राहते. हा तलाव दिना नदीवर बांधण्यात आला असल्याने पावसाळ्यात लवकरच भरतो. असा दरवर्षीचा अनुभव आहे. मात्र यावर्षी हा तलाव आॅगस्ट महिना उलटला तरी अजूनपर्यंत भरला नाही.१ सप्टेंबरपर्यंत या तलावात केवळ ६१ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी १ सप्टेंबरला हा तलाव १०० टक्के भरला होता. रेगडी तलावाच्या अंतर्गत धान पिकाची शेती आहे. त्यामुळे जवळपास दोन महिने आणखी पाणी पुरवावे लागणार आहे. १०० टक्के तलाव भरला असला तरच दोन महिने पाणी पुरणार आहे. तलावाचा नहर सोडण्यात आला आहे. त्यामुळे तलावातील पाणी कमी होत आहे. सप्टेंबर महिन्यात पाऊस पडणे आवश्यक आहे.सोयाबिन, कापूस पीक जोमातचामोर्शी, मुलचेरा, सिरोंचा, अहेरी या तालुक्यांमध्ये सोयाबिन, कापूस पिकाचेही उत्पादन घेतले जाते. यावर्षी पाऊस कमी पडला. त्यामुळे सोयाबिन, कापूस पीक जोमात असल्याचे दिसून येत आहे. कापसाला डवरणी करण्याचे काम नुकतेच पार पडले आहे.