शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

सिरोंचातील जलसाठे कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:27 IST

तालुक्यातील जलसाठे पूर्णपणे कोरडे पडले असल्याने तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मानवासह पशुपक्ष्यांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सिरोंचा तालुक्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ८५ टक्के क्षेत्रावर जंगल आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाई तीव्र : उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाची चालढकल सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तालुक्यातील जलसाठे पूर्णपणे कोरडे पडले असल्याने तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मानवासह पशुपक्ष्यांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.सिरोंचा तालुक्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ८५ टक्के क्षेत्रावर जंगल आहे. जंगलातील वन्यजीव जंगलातील जलसाठ्यांवर तहान भागवतात. मात्र नैसर्गिक जलसाठे आटले आहेत. वन्यजीवांच्या पाण्याची सोय जंगलातच करण्यासाठी वनविभागाला कोट्यवधी रुपयांचा दरवर्षी निधी प्राप्त होते. मात्र वनविभाग सुद्धा सदर निधी जलसाठे निर्मितीवर खर्च करीत नाही. परस्पर या निधीची विल्हेवाट लावली जाते. जंगलातील कामांचे मूल्यमापन होत नाही. याचा गैरफायदा वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला जातो. जंगलातील जलसाठे आटल्याने वन्यजीव आता गावाकडे धाव घेऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांची शिकार होण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे.दुर्गम भागातील नागरिक हातपंप व विहिरीच्या पाण्यावर तहान भागवतात. मात्र विहीर व हातपंपानी तळ गाठला असल्याने तीव्र पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. जवळपासच्या नदीचे पाणी आणून तहान भागविली जात आहे. हातपंप बंद असतानाही पंचायत समितीमध्ये कार्यरत यांत्रिकी विभाग याकडे लक्ष देत नाही. ग्रामपंचायती सुद्धा हातपंप बंद असल्याबाबत यांत्रिक विभागाकडे तक्रार करीत नसल्याचे दिसून येते.गावातील एखाद्या हातपंपाला पाणी असल्यास त्या हातपंपावर महिलांची गर्दी दिसून येते. पाणी मिळावे, यासाठी रात्रीच पाणी भरावे लागत आहे. सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र तक्रारी होत नसल्याने प्रशासनातील अधिकारी सुद्धा लक्ष देत नाही.तलावांचे खोलीकरण रखडलेसिरोंचा तालुक्यात धानाची शेती केली जाते. धानाला सिंचन देण्यासाठी प्रत्येक गावात मामा तलाव आहेत. मात्र या तलावांमध्ये गाळ साचल्याने तलावांची पाणीसाठवण क्षमता कमी झाली आहे. तलावांचे खोलीकरण करणे आवश्यक आहे. मात्र खोलीकरण झाले नसल्याने मार्च महिन्यातच तलाव कोरडे पडतात.जंगलातील जलसाठे आटल्यानंतर वन्यजीव गावाजवळच्या तलावात पाणी पिण्यासाठी येतात. मात्र हे तलाव सुद्धा कोरडे पडले असल्याने वन्यजीवांची मोठी पंचाईत झाली आहे. पाण्याअभावी कित्येक वन्यजीवांना आपला जीव गमवावा लागत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई