शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

पालिकेने लावला पाणी चोरीला लगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 00:32 IST

उन्हाळ्याच्या दिवसात नजीकच्या वैनगंगा नदीची पाणी पातळी प्रचंड खालावत असल्याने शहराच्या चढ्या भागात नळाचे पाणी येत नाही. परिणामी दरवर्षी उन्हाळ्यात गडचिरोली शहराच्या अनेक वॉर्डात पाणी टंचाईच्या प्रश्नावरून बोंब होत असते.

ठळक मुद्देदोन महिन्यातील कारवाई : आतापर्यंत ५७ टिल्लुपंप जप्त; एकही पंप सोडविला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : उन्हाळ्याच्या दिवसात नजीकच्या वैनगंगा नदीची पाणी पातळी प्रचंड खालावत असल्याने शहराच्या चढ्या भागात नळाचे पाणी येत नाही. परिणामी दरवर्षी उन्हाळ्यात गडचिरोली शहराच्या अनेक वॉर्डात पाणी टंचाईच्या प्रश्नावरून बोंब होत असते. अशा परिस्थितीत गेल्या दोन महिन्यात टिल्लूपंपाने पाणी खेचणाऱ्या ५७ जणांवर पालिकेने कारवाई करून त्यांचे पंप जप्त केले. कारवाईच्या माध्यमातून पालिका प्रशासनाने शहरातील पाणी चोरीला लगाम लावला आहे.दरवर्षीच्या उन्हाळ्यात पाणी पुरवठ्याची समस्या निर्माण होते. आपल्याला पुरेसे पाणी मिळावे म्हणून अनेक लोक नळाला टिल्लू पंप लावून पाणी खेचतात. ही समस्या काही प्रमाणात मार्गी लावण्यासाठी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी स्वतंत्र पथक गठीत केले. सदर पथकाने एप्रिल व मे या दोन महिन्याच्या कालावधीत एकूण ५७ टिल्लुपंप जप्त केले. या कारवाईमुळे नळाला टिल्लुपंप लावून अधिकचे पाणी खेचणाऱ्यांना आळा बसला.ज्या नळधारकांचे टिल्लुपंप जप्त करण्यात आले, त्या प्रत्येक नळधारकावर दोन हजार रूपयांचा दंडही आकारण्यात आला आहे. तसेच टिल्लुपंप सोडवून घेण्यासाठी पालिकेकडे रितसर अर्ज करून दंडाची रक्कम व इतर शुल्काची रक्कम संबंधितांनी अदा करावी, असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने केले. मात्र एकाही नळधारकाने टिल्लुपंप शुल्काची रक्कम भरून तो सोडविला नाही, हे विशेष.एखाद्या टिल्लुपंपधारकाला त्याचा जप्त केलेला टिल्लुपंप सोडवून परत न्यावयाचा असल्यास संबंधितांनी पालिकेकडे लेखी अर्ज करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या अर्जात कोणत्या तारखेपासून टिल्लुपंप लावून किती पाण्याचा उपसा केला. याचा उल्लेख असावा, असे मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांनी सूचित केले आहे. टिल्लुपंप लावून पाण्याचा अधिक उपसा केल्याचे संबंधित नळधारकाकडून या अर्जाच्या माध्यमातून कबूल केले जाते. यावरून पालिका प्रशासनाच्या वतीने संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यास सुलभ होते. अशा प्रकारच्या कारवाईच्या भितीने एकाही टिल्लुपंपधारकांनी रितसर अर्ज करून आपला टिल्लुपंप सोडविला नाही. मुख्याधिकाऱ्यांच्या कठोर धोरणामुळे टिल्लुपंपधारकांना धसका बसला असून पाणी चोरीला लगाम बसला आहे.दरवर्षी उन्हाळ्यात मार्च महिन्यापासूनच वैनगंगा नदीची पाणी पातळी खालावत असल्याने शहराच्या विविध वार्डात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत होती. या नळाला टिल्लुपंप लावणे हा प्रकारही कारणीभूत होता. मात्र पालिकेचे मुख्याधिकारी निपाने व पाणी पुरवठा सभापती प्रविण वाघरे यांच्या नियोजनबध्द कारभारामुळे यंदा शहरात फारशी पाणी टंचाई नसल्याचे दिसून येत आहे.नळ पाणी पुरवठ्याचा दाब वाढलामार्च महिन्यात तसेच एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेक नळधारकांच्या घरी नळाद्वारे येणाऱ्या पाण्याचा दाब कमी होता. कारण शहरातील बरेचशे नळधारक नळाला टिल्लुपंप लावत होते. मात्र पालिकेने टिल्लुपंप जप्तीची कारवाई हाती घेतल्यानंतर अनेकांनी नळाला टिल्लुपंप लावणे बंद केले. परिणामी अनेकांच्या नळ पाणी पुरवठ्याचा दाब वाढला आहे. अशी प्रतिक्रियाही अनेकांनी मुख्याधिकाºयांना दिली आहे.पालिका प्रशासनाच्या वतीने टिल्लुपंप जप्त मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेला आणखी वेग देण्यात येणार आहे. नळाला टिल्लुपंप लावून पाणी खेचत असल्याचे दिसल्यास कोणालाही माफ केले जाणार नाही. शहरातील सर्व नळधारकांना समान व पुरेशा प्रमाणात पाणी मिळण्यासाठी टिल्लुपंप लावण्याचा प्रकार संबंधितांनी बंद करावा. पालिकेच्या पथकातील कर्मचारी नळ येण्याच्या वेळी सकाळी व सायंकाळी शहराच्या विविध वार्डात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून ही कारवाई करीत आहेत.- कृष्णा निपाने, मुख्याधिकारी,नगर परिषद गडचिरोलीटिल्लुपंप जप्तीच्या कारवाईमुळे नळधारकांना योग्यरित्या पाणी मिळत आहे. पालिकेची नळ योजना असलेल्या वैनगंगा नदीची पाणी पातळी खालावली असली तरी शहरात फारशी पाणी टंचाई नाही. तसेच पाणी टंचाईच्या नावावर लोकांच्या तक्रारीही नाहीत. उर्वरित उन्हाळाभर शहरात पाणी टंचाई निर्माण होऊ देणार नाही. काही दिवसांपूर्वी पाणी पातळी खालावल्याने शहरात पाणी समस्या निर्माण झाली होती. त्यानंतर आपण स्वत: नळ योजनेच्या ठिकाणी नदीवर जाऊन उचित कार्यवाही केली.- प्रविण वाघरे, पाणी पुरवठा सभापती, न.प. गडचिरोली