शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
"सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
6
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
7
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
8
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
9
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
10
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
11
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
12
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
13
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
14
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
15
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
16
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
17
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
18
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
19
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
20
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!

जिकडे तिकडे पाणीच पाणी

By admin | Updated: July 16, 2014 00:09 IST

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २४ तासात ५९.०५ मिमीच्या सरासरीने ७१४.१ मिमी पाऊस झाल्याने कठाणी, इंद्रावती, पर्लकोटा, पामुलगौतम यासह अनेक नद्या व नाले दुथळी भरून वाहत आहे.

शेतकरी सुखावला : कठाणीसह अनेक नद्या फुगल्या; धानोरा तालुक्यातील दोन मार्ग बंदगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २४ तासात ५९.०५ मिमीच्या सरासरीने ७१४.१ मिमी पाऊस झाल्याने कठाणी, इंद्रावती, पर्लकोटा, पामुलगौतम यासह अनेक नद्या व नाले दुथळी भरून वाहत आहे. यामुळे धानोरा तालुक्यात तीन मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. सकाळी ९ वाजतापासून धानोरा-गडचिरोली मार्गावरची वाहतूक रांगी नाल्यावर पाणी चढल्याने बंद झाली. या नाल्यावर ४ ते ५ फूट पाणी चढले होते. तसेच धानोरा-मुरूमगाव-राजनांदगाव हा मार्गही कठाणी नदीला पूर आल्याने वडगाव, बेलगाव येथे बंद झाला होता. तसेच धानोरा-रांगी-आरमोरी हा मार्गही सोडे गावाजवळ कठाणी नदीला पूर आल्याने बंद झाला होता. सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास मुरूमगाव मार्ग खुला झाला. राजनांदगाववरून दोन बसगाड्या धानोरा येथे येऊन थांबल्या. मात्र अन्य दोन मार्गावरची वाहतूक बंदच होती. गडचिरोली शहरातही रात्रभर पाऊस असल्याने मुख्य मार्गालगतचे अंतर्गत रस्ते जलमय झाले होते. पोलीस ठाण्यामध्येही पाणी साचले. तसेच भातगिरणीकडे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह वाहत होता. कन्नमवार नगरमध्ये राधे बिल्डींगच्या मागे सर्व परिसर जलमय झाला होता. नगर परिषद परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. भामरागड तालुक्यालगत छत्तीसगड राज्यातही संततधार पाऊस असल्याने भामरागड येथील पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली होती. गडचिरोली शहरासारखीच अन्य तालुका शहराची स्थिती होती. दमदार पावसामुळे गडचिरोली शहरातील नाल्या तुडूंब भरून वाहत होत्या.