शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मेंढा घाटातून होते दिवसाढवळ्या रेती चोरी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 06:00 IST

गडचिरोली शहरात मोठय़ा प्रमाणात बांधकाम सुरू आहेत. मात्र रेती घाटांचे लिलाव झाले नसल्यामुळे रेतीचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा गैरफायदा रेती तस्करांनी घेण्यास सुरूवात केली आहे. गडचिरोली शहरापासून चार किमी अंतरावर कठाणी नदी आहे. या नदीच्या मेंढा (बोदली) घाटातून बोदलीमार्गे गडचिरोली शहरात रेती आणली जात आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । जेप्रा व बोदलीवासीयांची महसूल व पोलीस विभागाकडे तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोलीपासून अगदी चार किमी अंतरावर असलेल्या बोदलीजवळील मेंढा घाटातून दिवसाढवळ्या ट्रॅक्टरने दरदिवशी शेकडो ब्रॉस रेती चोरून गडचिरोली शहरात विकली जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या गावातील महसूल विभागाच्या कर्मचा:यांचे याकडे पूर्णपणो दुर्लक्ष असून विभागाच्या कार्यशैलीबाबत नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.गडचिरोली शहरात मोठय़ा प्रमाणात बांधकाम सुरू आहेत. मात्र रेती घाटांचे लिलाव झाले नसल्यामुळे रेतीचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा गैरफायदा रेती तस्करांनी घेण्यास सुरूवात केली आहे. गडचिरोली शहरापासून चार किमी अंतरावर कठाणी नदी आहे. या नदीच्या मेंढा (बोदली) घाटातून बोदलीमार्गे गडचिरोली शहरात रेती आणली जात आहे. विशेष म्हणजे, बोदली ते गडचिरोली हा राज्य महामार्ग आहे. या मार्गावरून रात्रंदिवस वाहनांची वर्दळ राहते. असे असतानाही सदर वाहने पोलीस किंवा महसूल विभागाच्या नजरेस आलेली नाही. काही ट्रॅक्टरमधील रेती इंदिरा नगरात जात आहे. कारवाई होत नसल्याने रेती तस्करांची हिंमत वाढत चालली आहे. सदर रेती गडचिरोली शहरात तीन ते चार हजार रुपये प्रती ट्रॅक्टर दराने विकून एका रात्रीतून रेती तस्कर 3क् ते 4क् हजार रुपये कमवित आहेत. मेंढा (बोदली) घाटातून खुलेआम रेतीची चोरी होत असल्याची तक्रार जेप्रा व बोदली येथील काही नागरिकांनी जिल्हाधिकारी व गडचिरोली पोलिसांकडे केली आहे. आता ते काय कारवाई करतात याकडे गावक:यांचे लक्ष लागले आहे.चोरीचा व्हिडीओ व्हायरलमेंढा (बोदली) रेती घाटातून दिवसाढवळ्या रेतीची चोरी केली जात आहे. याचा व्हिडीओ काही जागरूक नागरिकांनी मोबाईलने काढून तो व्हायरल केला आहे. या व्हिडिओमध्ये जवळपास चार ते पाच ट्रॅक्टर नदी पात्रतून रेतीची चोरी करीत असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ मेंढा (बोदली) घाटाचा असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडीओमध्ये दिसणा:या ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई करावी, अशी मागणी आहे.बोदलीवासीय त्रस्तनदी पात्रतून रेती भरल्यानंतर सदर ट्रॅक्टर प्रचंड वेगाने चालवितात. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, रात्री रेतीची चोरीचे प्रमाण वाढत असल्याने ट्रॅक्टरच्या आवाजाने बोदलीवासीयांची झोपमोड होत आहे. यामुळे ते कमालीचे त्रस्त झाले आहेत. या रेती तस्करांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ते करत आहेत.
टॅग्स :sandवाळू