शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

वडापाव विकायचाय, मग तुम्ही परीक्षा पास केली का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 15:03 IST

कार्यशाळेद्वारे मार्गदर्शन : भेसळ रोखण्यासाठी अन्न विभागाची मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यावर मात करण्यासाठी अनेक जण स्वयंरोजगार उभारतात. हा स्वयंरोजगार खाद्यपदार्थाशी संबंधित असतो. गावखेडे असोत किंवा मोठी शहरे या ठिकाणी चौकांमध्ये, रस्त्यालगत चहा, वडापाव व अन्य खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्या दिसतात; परंतु आता अशा पद्धतीने व्यवसाय करता येणार नाही. विविध खाद्यपदार्थ तयार करून विक्री करायची झाली, तर त्यासाठी प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त करणे गरजेचे झाले आहे. इतर जिल्ह्यांमध्ये मात्र यासाठी ५० गुणांची परीक्षा द्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे, ही परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.

केंद्र सरकारच्या भारतीय अन्नसुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी प्राधिकरणाने खाद्यपदार्थ तयार करणे व हाताळणी करणाऱ्यांना प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. यासंदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये हॉटेलमालक, खाद्यपदार्थ विक्रेत्यांची कार्यशाळा घेतली जात आहे. कार्यशाळेनंतर उपस्थित प्रतिनिधींची त्याच ठिकाणी परीक्षा घेतली जाते किंवा एखादा दिवस निश्चित केला जातो. अनुत्तीर्ण झालेल्यांसाठी पुन्हा परीक्षा देण्यासाठी दिवस निश्चित केला जातो. 

जिल्ह्यात अन्न विभागातर्फे कार्यशाळा घेऊन हॉटेल विक्रेते, खाद्य पदार्थ विक्रेत्यांना प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणात त्यांना अन्न पदार्थ हाताळणे, स्टोअर करणे, नाशवंत पदार्थ साठवणूक करणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाते. कार्यशाळेनंतर संबंधितांना प्रमाणपत्र वाटप केले जाते. जिल्ह्यात आतापर्यंत परीक्षा घेतलेली नाही. 

दूध विकणाऱ्यांची घेणार का परीक्षा? जिल्ह्यात शासकीय दूध संकलन करणाऱ्या संस्था नाहीत. खुल्या पद्धतीने दुधाची विक्री घरोघरी केली जाते किंवा ज्या प्रकल्पांमध्ये दूध हाताळणी होते, तेथील कर्मचारी किंवा मालकांची परीक्षा घेणार काय, असा प्रश्न आहे.

कोणाला ही परीक्षा द्यावी लागणार? हॉटेलचालक- मालक, कुक, आईस्क्रीम गाडीचा चालक-मालक, वडापाव गाडीचालक, चहाची टपरीचालक, घरपोच भोजन पुरवठा करणारे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तयार करणारे व्यावसायिक, मिठाई दुकानदार, केक-खवा तयार करणारे व्यावसायिक यासह सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करणाऱ्यांना आता हे प्रशिक्षण आणि परीक्षा सक्तीची करण्यात आली आहे.

पास नाही तोपर्यंत द्यावी लागते परीक्षा परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्यांसाठी पुन्हा परीक्षा देण्याची सुविधा आहे. जोपर्यंत तो व्यावसायिक या परीक्षेत पास होणार नाही, तोपर्यंत त्याला परीक्षा द्यावीच लागणार आहे, असा नियम आहे. जिल्ह्यात याबाबत अजूनपर्यंत पत्र प्राप्त झालेले नाही.

"जिल्ह्यातील खाद्य पदार्थ विक्रेते, हॉटेलचालक- मालक तसेच बेकरीचालक व अन्य पदार्थ विक्रेत्यांची कार्यशाळा घेऊन त्यांना मार्गदर्शन केले जात आहे. जिल्ह्यात अजूनपर्यंत परीक्षा घेण्यात आलेली नाही."- सुरेश तोरेम, अन्न सुरक्षा अधिकारी

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली