शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
5
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
6
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
7
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
8
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
9
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
10
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
11
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
12
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
13
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
14
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
15
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
16
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
17
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
18
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा युवा नेता निघाला काँग्रेसचा आमदार, वाद होताच दिला पदाचा राजीनामा
19
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
20
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार

अद्ययावत रूग्णवाहिकेची प्रतीक्षा

By admin | Updated: December 9, 2014 22:51 IST

स्थानिक ग्रामीण रूग्णालयात अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असलेली एकही रूग्णवाहिका नसल्याने येथील रूग्णांना जुन्या भंगार रूग्णवाहिकांमधून दुसऱ्या रूग्णालयात हलवावे लागत आहे.

देसाईगंज : स्थानिक ग्रामीण रूग्णालयात अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असलेली एकही रूग्णवाहिका नसल्याने येथील रूग्णांना जुन्या भंगार रूग्णवाहिकांमधून दुसऱ्या रूग्णालयात हलवावे लागत आहे. देसाईगंज शहर व संपूर्ण तालुक्याच्या आरोग्य व्यवस्थेची मदार देसाईगंज येथील ग्रामीण रूग्णालयावर अवलंबून आहे. जुनी इमारत लहान असल्याने नवीन व प्रशस्त इमारत बांधण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत होती. त्यानुसार देसाईगंज शहरात २०१२ साली ग्रामीण रूग्णालयाची नवीन इमारत बांधण्यात आली. इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असलेली रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले. या बाबीला आता दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असला तरी अजूनपर्यंत या रूग्णालयाला अत्याधुनिक सोयीसुविधा असलेली रूग्णवाहिका देण्यात आली नाही.जिल्हा सामान्य रूग्णालयात रूग्णवाहिका आहेत. मात्र त्या भंगार स्थितीत आहेत. या रूग्णावाहिकांमध्ये आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध नाही. रूग्णाला झोपविण्यासाठी सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे रूग्णाला प्रवाशाप्रमाणेच बसवूनच गडचिरोली किंवा नागपूर येथील रूग्णालयात भरती करावे लागते. मात्र नाईलाज असल्याने या सर्व हालअपेष्टा सहन कराव्याच लागतात. देसाईगंज रूग्णालय वगळता इतर सर्वच रूग्णालयांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेल्या रूग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्याला केंद्र व राज्य शासनाचा कोट्यवधी रूपयांचा निधी प्राप्त होतो. मात्र या निधीचा उपयोग आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी फारच कमी प्रमाणात केला जातो. परिणामी नागरिकांना शासकीय रूग्णालयात अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. जुन्या पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. सत्तेत आलेल्या नवीन सरकारमधील ज्या मंत्र्यांकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात येईल, त्यांनी अत्याधुनिक रूग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आहे. (वार्ताहर)