मागील एक वर्षापासून बांधकाम पूर्ण : चातगाव येथील कार्यालये भाड्याचाच खोलीतचातगाव : महसूल मंडळ चातगाव येथे प्रशासकीय इमारत बांधण्यात आली आहे. मात्र सदर इमारतीचे महसूल विभागाकडे अजूनही हस्तांतरण झाले नाही. त्यामुळे या इमारतीत शासकीय कार्यालये सुरू झाले नाही.सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली येऊन जनतेची कामे सुरळीत होण्याच्या उद्देशाने चातगाव येथे प्रशासकीय इमारत बांधण्यात आली आहे. सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र ही इमारत महसूल विभागाला हस्तांतरीत करण्यात आली नाही. चातगाव येथील सर्वच कार्यालये भाड्याच्या खोलीत आहेत. तलाठी कार्यालय १० बाय १० च्या खोलीत सुरू आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तलाठी कार्यालय, मंडळ कार्यालय, कृषी विभाग, वीज विभाग, ग्राम पंचायत सुद्धा भाड्याच्या खोलीत आहेत. विशेष म्हणजे ही कार्यालये एकमेकांपासून दूर असल्याने नागरिकांना गैरसोयीचे होत आहे. त्यामुळे प्रशासकीय कार्यालयाचा तत्काळ ताबा घेऊन या इमारतीत कार्यालये सुरू करावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
प्रशासकीय इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
By admin | Updated: August 21, 2015 01:53 IST