शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

१०८ रुग्णवाहिकेसाठीही करावी लागते वेटींग; दरदिवशी ९० काॅल्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 05:00 IST

सर्वसाधारण स्थितीतील काेराेना रुग्णाला काेविड केअर सेंटरवर भरती केले जाते. त्याची प्रकृती बिघडल्यास त्याला जवळच्या रुग्णालयात भरती करावे लागते. तर तालुकास्तरावरील रुग्णालयात सुविधा नसल्यास जिल्हास्तरावर हलवावे लागते. साेबतच इतर आजारांचे रुग्णसुद्धा भरती करावे लागत असल्याने ॲम्ब्युलन्सवरील कामाचा भार वाढला.

ठळक मुद्देकाेराेनामुळे रेफरची संख्या वाढली

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेना रुग्णांच्या वाढत्या संख्येचा भार रुग्णवाहिकेवरही पडत चालला आहे. काेराेनाच्यापूर्वी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेसाठी गडचिराेली जिल्ह्यातून दिवसभरात ३० ते ४० काॅल्स येत हाेते. आता मात्र दिवसाला जवळपास ९० काॅल्स येत आहेत. काॅल केल्यानंतर रूग्णवाहिका एक ते दाेन तासाने उपलब्ध हाेते. सर्वसाधारण स्थितीतील काेराेना रुग्णाला काेविड केअर सेंटरवर भरती केले जाते. त्याची प्रकृती बिघडल्यास त्याला जवळच्या रुग्णालयात भरती करावे लागते. तर तालुकास्तरावरील रुग्णालयात सुविधा नसल्यास जिल्हास्तरावर हलवावे लागते. साेबतच इतर आजारांचे रुग्णसुद्धा भरती करावे लागत असल्याने ॲम्ब्युलन्सवरील कामाचा भार वाढला.

दीड महिन्यात १,४०२ काेराेना रुग्णांची वाहतूक१ मार्च ते १६ एप्रिल या कालावधीत जिल्हाभरातील १,४०२ काेराेना रुग्णांची वाहतूक करण्यात आली आहे. तालुकास्तरावरून जिल्हास्तरावर काेराेना रुग्णाला भरती करण्यासाठी रुग्णवाहिकांचा वापर सर्वाधिक हाेत आहे. 

आश्रमशाळांच्या रुग्णवाहिका आराेग्य सेवेत सिराेंचा तालुक्यातील बामणी, अहेरी तालुक्यातील खमनचेरू, मुलचेरा, एटापल्ली, चामाेर्शी तालुक्यातील मार्कंडादेव, गडचिराेली येथील इंग्रजी माध्यमाची आश्रमशाळा, मुरूमगाव व रामगड येथील आठ आश्रमशाळांमध्ये आदिवासी विकास विभागाने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. आश्रमशाळांना सुट्या असल्याने या रुग्णवाहिका आराेग्य विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. तालुका ते जिल्हास्तरावर रूग्णवाहिका काेराेना रूग्णांची वाहतूक करण्यात व्यस्त राहत असल्याने अपघात व इतर राेगांच्या रूग्णांसाठी वेळेवर रूग्णवाहिका उपलब्ध हाेत नाही.

जिल्ह्यात केवळ १० रुग्णवाहिकाजिल्ह्यात केवळ १० रुग्णवाहिका आहेत. यामध्ये ८ बेसिक लाईफ सपाेर्ट आणि २ ॲडव्हान्स लाईफ सपाेर्ट रुग्णवाहिका आहेत. ॲडव्हान्स लाईफ सपाेर्ट रुग्णवाहिकेत व्हेंटिलेटर व शाॅक देण्याची मशीन उपलब्ध आहे. जिल्हा रुग्णालयात २ रुग्णवाहिका, महिला रुग्णालय गडचिराेली येथे १ रुग्णवाहिका, काेरची, कुरखेडा, सिराेंचा, अहेरी, एटापल्ली, भामरागड व आरमाेरी येथे प्रत्येकी १ रुग्णवाहिका उपलब्ध आहे. जिल्ह्याचा व्याप लक्षात घेता रुग्णवाहिकांची संख्या कमी आहे. आश्रमशाळांच्या ८ रुग्णवाहिका आराेग्य विभागाकडे तात्पुरत्या हस्तांतरित केल्याने काेराेनाच्या रुग्णांची वाहतूक हाेण्यास हातभार लागत आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या