शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
2
Asia Cup 2025 : आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
3
Koyna Earthquake: कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
4
GST कपातीनंतर आता EMI चा भारही हलका होणार; कर्जाचे ३ नियम १ ऑक्टोबरपासून लागू
5
Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?
6
Buy Now, Pay Later वर संकट? या कंपनीला लागलं टाळं; 'फ्री' दिसणाऱ्या या स्कीममागील 'गेम' काय?
7
'स्टुडंट ऑफ द इयर' फेम अभिनेत्याला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक, बॅगेत सापडलं ३.५ किलो कोकेन
8
"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?
9
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
10
या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी...
11
बेबी खान लवकरच येणार, शूराचं पार पडलं डोहाळजेवण; सलमानसह टीव्ही कलाकारांची हजेरी
12
ईव्हीचा 'सायलेंट धोका' संपणार! इलेक्ट्रिक वाहनांसाठी AVAS ध्वनी प्रणाली अनिवार्य होणार? काय आहे प्रकार?
13
मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले
14
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
15
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी ८० अंकांनी वधारला, मेटल-आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी
16
October Baby Astro: कसे असतात ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेले लोक? स्वभाव, गुण, दोष; सगळंच जाणून घ्या
17
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
18
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
20
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ

प्रतीक्षा संपली, जिल्ह्यात १६ पासून कोरोना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:30 IST

जिल्ह्यातील पाच लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी १०० कर्मचारी याप्रमाणे ५०० जणांना लस टोचली जाणार आहे. या लसीकरणाच्या शुभारंभानिमित्त व त्याच्या ...

जिल्ह्यातील पाच लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी १०० कर्मचारी याप्रमाणे ५०० जणांना लस टोचली जाणार आहे. या लसीकरणाच्या शुभारंभानिमित्त व त्याच्या नियोजनाबाबत व्हीसीद्वारे विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी बुधवारी नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांचा आढावा घेतला. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी अनंत वालस्कर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, डॉ. बागराज धुर्वे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील मडावी, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर उपस्थित होते.

नियोजनाचा आढावा घेताना विभागीय आयुक्तांनी आरोग्य अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. जिल्हा मुख्यालयी नियंत्रण कक्ष स्थापन करावा. लसीकरणाबाबत पुरवठा, साठवणूक व प्रत्यक्ष लसीकरण याबाबत त्या कक्षातून संनियंत्रण करावे. लसीकरणपश्चात येणाऱ्या अडचणी व गैरसमज दूर करण्यासाठी हा कक्ष काम करील, त्याचबरोबर लसीकरण प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, व्यत्यय व लोकांकडून येणाऱ्या समस्या अति तात्काळ सोडविण्यासाठी या प्रक्रियेतील अधिकारी, डॉक्टर्स व तज्ज्ञ यांचा व्हॉटस्‌ॲप ग्रुप तयार केला जाणार आहे. जेणेकरून लसीकरण प्रक्रिया सोयीस्कर होईल, असे विभागीय आयुक्तांनी यावेळी सांगितले.

(बॉक्स)

आज मिनी मॉक ड्रील

प्रत्यक्ष लसीकरणाआधी गुरुवारी पुन्हा एकदा मिनी मॉक ड्रील (रंगीत तालीम) होणार आहे. प्रत्येकी १० लाभार्थी या प्रमाणे दुपारी १ तास ही रंगीत तालीम चालेल. लसीकरणाची तयारी व प्रक्रिया याबाबत त्यात प्रात्यक्षिक घेतले जाईल. जिल्हा रुग्णालयात यापूर्वी मॉक ड्रील झाल्यामुळे पाचपैकी इतर चार ठिकाणी, म्हणजे उपजिल्हा रुग्णालय अहेरी, आरमोरी, कुरखेडा व चामोर्शी या ठिकाणी ही रंगीत तालीम घेतली जाईल.

(बॉक्स)

या पाच बुथवर दिली जाणार लस

१) पहिल्या टप्प्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाची लस दिली जाईल. या ठिकाणी लस साठवण्याची सुविधा असून, सर्वाधिक रुग्ण आणि आरोग्य कर्मचारीही गडचिरोलीतच असल्यामुळे त्यांना या रुग्णालयात लस दिली जाईल.

२) याशिवाय अहेरी, आरमोरी, कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालय आणि चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालय अशा पाच ठिकाणी दररोज १०० याप्रमाणे सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.

३) ९९६६ पैकी उर्वरित आरोग्य कर्मचाऱ्यांना पुढील काळात लस दिली जाणार आहे. कर्मचाऱ्यांनी ज्या क्रमाने लसीकरणासाठी नोंदणी केली त्यानुसार त्यांना लसीकरणासाठी मोबाइलवर संदेश जाईल.

(बॉक्स)

लसीकरणासाठी निवड पद्धत

ऑनलाइन ‘कोविन’ या संकेतस्थळावर लस द्यावयाच्या कर्मचाऱ्यांची माहिती अपलोड केली जाणार आहे. त्यातील नावांप्रमाणे १०० लोकांची एका केंद्रावर निवड केली जाणार आहे. निवडलेल्या व्यक्तींना मोबाइलवर संदेश पाठविला जाईल, तसेच जिल्हा कक्षाकडून दूरध्वनीद्वारे लसीकरण ठिकाण व वेळही कळविली जाणार आहे. संदेश मिळाल्यानंतर एखाद्याला येणे शक्य नसेल तर त्याबाबतची माहिती आपल्या कार्यालयाकडे द्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.