शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
2
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
3
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
4
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
5
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
6
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
7
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
8
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
9
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 
10
Shreyas Iyer : श्रेयस लवकर बरा व्हावा! सूर्याच्या आईची देवासमोर प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल
11
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
12
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
13
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
14
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
15
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
16
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
17
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
18
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
19
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
20
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस

वैनगंगेचा प्रवाह तोडतोय दम, तीव्र जलसंकटाची चाहूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 22:59 IST

वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात कमी झाली आहे. याचा फटका गडचिरोली शहराला बसण्यास सुरूवात झाली असून भविष्यात जलसंकट तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देजॅकवेलचा दोनपैकी एक पाईप पाण्याच्या बाहेर : पाण्याचा जपून वापर करण्याचे नगरपरिषदेतर्फे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात कमी झाली आहे. याचा फटका गडचिरोली शहराला बसण्यास सुरूवात झाली असून भविष्यात जलसंकट तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.गडचिरोली शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी वैनगंगा नदी पात्रात इनटेकवेल खोदण्यात आली आहे. या विहिरीला पाणी येण्यासाठी दोन पाईप बसविण्यात आले आहेत. त्यापैकी एक पाईप पाण्यात पडून आहे. तर दुसरा पाईप पूर्णपणे पाण्याच्या बाहेर पडला आहे. त्यामुळे पंपाला पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नसल्याने मागील दहा दिवसांपासून गडचिरोली शहराला अपुरा पाणी पुरवठा होत आहे. एक महिन्यापूर्वी जेसीबीच्या सहाय्याने नगर परिषदेने इनटेकवेलजवळ बंधारा बांधला. २०० फूट अंतरापर्यंत रेती उपसून नदीची पूर्ण धार विहिरीच्या बाजुला वळविली आहे. एक महिन्यापूर्वी दुसरा पाईप अर्धा पाण्यात बुडून होता. मात्र मागील १५ दिवसांपासून पाणी पातळी प्रचंड खाली गेली आहे. पाईप पूर्णपणे वर आला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला ही स्थिती आहे. जून महिन्यापर्यंत जवळपास अडीच महिने पुन्हा उन्हाळा शेकणार आहे. या कालावधीत जलसंकट तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जलशुध्दीकरण केंद्राला पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत नसल्याने या ठिकाणचे पंप जवळपास एक तास बंद ठेवावे लागत आहेत. त्यामुळे पाण्याच्या टाक्या पूर्ण भरत नाही. त्यातच उन्हाळा लागल्याने पाण्याचा वापर वाढला आहे. पाण्याची मागणी व पुरवठा यामध्ये असमतोल निर्माण झाला असल्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.दर दिवशी ६४ लाख लिटर पाणी पुरवठागडचिरोली शहराला दर दिवशी ६४ लाख लिटर पाणी पुरवठा केला जातो. शहराची लोकसंख्या जवळपास ५० हजार आहे. म्हणजेच प्रत्येक नागरिकाला दिवसाला १२८ लिटर पाणी पुरवठा होतो. शासनाच्या नियमानुसार प्रती व्यक्ती १३५ लिटर पाणी लागते. यावरून नगर परिषद प्रत्येक व्यक्तीला आवश्यक तेवढा पाणी पुरवठा करते. भावी जलसंकट लक्षात घेऊन नागरिकांनीही पाण्याचा जपून वापर करणे आवश्यक आहे.गोसेखुर्दमध्ये केवळ १० टक्के उपयुक्त जलसाठावैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढण्यासाठी गोसेखुर्द धरणावर आशा अवलंबून आहेत. मात्र या धरणातही केवळ १०.०३ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. एवढे पाणी पुन्हा अडीच महिने वापरावे लागणार आहे. त्यामुळे गोसेखुर्द प्रशासनाकडे जरी पाणी सोडण्याची मागणी केली तरी नियमाप्रमाणेच पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे.शहरातील सर्व वार्डांना पाणी पुरवठा व्हावा, यासाठी नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने नियोजन केले आहे. सद्य:स्थितीत वृध्दाश्रमाजवळील टाकीमधून ज्या वार्डांना पाणी पुरवठा होतो, त्या वार्डांना एकच वेळ पाणी पुरवठा केला जात आहे. सकाळी विवेकानंदनगर, कन्नमवार नगर, कॅम्पएरिया, शिवाजी नगर, रामनगर, स्नेहनगर, लांझेडा या वार्डांना पाणी पुरवठा होत आहे. तर गोकुलनगर, गणेश नगर, चनकाई नगर व पोस्ट कार्यालयाच्या मागील बाजूस सायंकाळी एकदाच पाणी पुरवठा सुरू आहे. नदीची पाणी पातळी कमी झाल्यास इतरही वार्डांना एकच वेळच्या पाण्यावर भागवावे लागणार आहे.