शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
6
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
7
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
8
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
9
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
10
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
11
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
12
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
13
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
14
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
15
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
16
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
17
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
18
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
19
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
20
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी

५३ केंद्रांवर आज ग्रामपंचायतींसाठी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:00 IST

जिल्ह्यात मंगळवार दि.२७ ला ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. यात ६ तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीत सार्वत्रिक तर १० तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीत पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

ठळक मुद्दे३५ केंद्र संवेदनशील : सार्वत्रिकच्या ३८ तर पोटनिवडणुकीच्या २४ जागांसाठी निवडणूक

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : जिल्ह्यात मंगळवार दि.२७ ला ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. यात ६ तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीत सार्वत्रिक तर १० तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीत पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. उर्वरित ग्रामपंचायतींमधील १४३ जागांवर सदस्यांची अविरोध निवड झाली असून ४३४ जागांवर मात्र निवडणूक लढण्यासाठी कोणीच नामांकन दाखल केले नसल्यामुळे त्या जागा रिक्त राहणार आहेत.लोकशाही पद्धतीतून होणाºया या निवडणुकीला जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नक्षल्यांचा नेहमी विरोध असतो. त्यामुळे जिल्ह्यात कोणतीही निवडणूक शांततेत पार पाडणे पोलीस यंत्रणेसमोर एक आव्हानच असते. ज्या ५३ केंद्रांवर ही निवडणूक होत आहे त्या केंद्रांपैकी १७ केंद्र अतिसंवेदनशिल तर १८ संवेदनशिल आहेत. त्यामुळे त्या केंद्रांवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व मतदान केंद्रांवरील कर्मचारी आज त्यांच्या बेस कॅम्पवर पोहोचले. सर्व संबंधित मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून जिल्हाधिकाºयांनी दि.२७ ला संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रासाठी स्थानिक सुटी जाहीर केली आहे.पोटनिवडणूक जाहीर झालेल्या २०७ ग्रामपंचायतींमध्ये सदस्या व सरपंचांची ५१९ पदे रिक्त आहेत. त्यामुळे अनेक जण निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक होते. मात्र आॅनलाईन नामांकन दाखल करण्यासाठी ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा नसल्यामुळे बरेच उमेदवार नामांकनच दाखल करू शकले नाही. १४३ जागांवर तर एकाच उमेदवाराचा अर्ज आल्याने त्यांची निवड अविरोध होत आहे, तर प्रत्यक्ष निवडणूक होत असलेल्या ६२ जागांपैकी पैकी २९ सार्वत्रिक निवडणुकीतील तर २४ पोटनिवडणुकीतील जागा आहेत. प्रत्यक्ष निवडणूक होत असलेल्या जागा कमी झाल्याने निवडणूक यंत्रणेसमोरील ताण कमी झाला असला तरी तब्बल ४३४ जागांवर निवडणूक न होणे ही बाब लोकशाही प्रक्रियेसाठी मारक ठरत आहे.सरपंचपदाच्या १६ जागांपैकी ५ जण अविरोध निवडल्या गेले आहेत. त्यामुळे ११ जागीच सरपंचपदाची निवडणूक होणार आहे. १६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सदस्यांच्या १२० जागांपैकी ४२ जागा अविरोध निवडल्या गेल्याने ३८ जागांसाठी मतदान होणार आहे. पोटनिवडणुकीतील २०७ ग्रामपंचायतींच्या ५१९ सदस्यांच्या जागांपैकी १०१ जागा अविरोध निवडल्या आहेत. त्यामुळे केवळ २४ जागांसाठी निवडणूक होत आहे.मुरूमगावच्या मतदार यादीत गडबडधानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथे वॉर्ड क्रमांक ३ मधील पोटनिवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीत वार्ड क्रमांक २ मधील नागरिकांचे नाव गेल्याचा प्रकार उघडकीस आला. तहसील कार्यालयाने पाठविलेल्या मतदार यादीनुसार वार्ड क्र.३ मधील मतदारांची एकूण संख्या ४७४ आहे. मात्र त्यात वार्ड २ मधील नागरिकांचा समावेश असल्याने येथील नागरिक अचंब्यात पडले आहेत. विशेष म्हणजे ही प्रारूप मतदार यादी दि.२५ फेब्रुवारीला ऐन वेळेवर पाठविण्यात आली आहे. या बेजबाबदारपणासाठी जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिक करीत आहेत.या ग्रामपंचायतींमध्ये होतेय निवडणूकसार्वत्रिक व पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये कोरची तालुक्यातील नवेझरी, बोदालदंड, दवंडी, कोटरा येथे सार्वत्रिक तर कोचीनारा येथे पोटनिवडणूक होत आहे. कुरखेडा तालुक्यात चिखली, आरमोरी तालुक्यातील अरसोडा व जोगीसाखरा येथे पोटनिवडणूक, गडचिरोली तालुक्यात देवापूर येथे सार्वत्रिक तर राजोली व कनेरी येथे पोटनिवडणूक, धानोरा तालुक्यात मिचगाव झाडा येथे सार्वत्रिक तर मेंढाटोला, चिंगली, मुरूमगाव येथे पोटनिवडणूक होणार आहे. चामोशी तालुक्यात तळोधी मे., वायगाव, अनखोडा, मार्कंडा क. तसेच मुलचेरा तालुक्यात विवेकानंदपूर येथे पोटनिवडणूक, एटापल्ली तालुक्यात हालेवारा येथे सार्वत्रिक तर तोडसा येथे पोटनिवडणूक, अहेरी तालुक्यात राजाराम येथे सार्वत्रिक तर खमनचेरू, इंदाराम, व्यंकटापूर, पेठा, जिमलगट्टा येथे पोटनिवडणूक, तथा सिरोंचा तालुक्यात कोटापल्ली येथे सार्वत्रिक आणि आसरअल्ली, अंकिसा, जाफ्राबाद येथे पोटनिवडणूक होत आहे.दुपारी ३ पर्यंतच मतदाननिवडणूक आयोगाने सुरूवातीला जाहीर केल्याप्रमाणे ही निवडणूक २५ फेब्रुवारीलाच होणार होती. मात्र आॅनलाईन नामांकनातील अडचणी लक्षात घेऊन निवडणूक कार्यक्रम २ दिवस पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे मतदानाची तारीखही २७ झाली. सकाळी ७.३० पासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.