शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
4
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
5
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
6
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
7
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
8
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
9
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
10
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
11
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
12
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
13
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
14
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
15
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
16
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
17
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
18
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
19
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
20
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता

११२४ गावकारभाऱ्यांसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:40 IST

२,३१,४८९ एकूण मतदार महिला : १,१४,२३५ पुरूष : १,१७,२५४ गडचिरोली : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी १७० ग्रामपंचायतींमध्ये मतदान ...

२,३१,४८९ एकूण मतदार

महिला : १,१४,२३५

पुरूष : १,१७,२५४

गडचिरोली : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी १७० ग्रामपंचायतींमध्ये मतदान होणार आहे. सकाळी ७.३० वाजता सुरू होणारे मतदान दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहील. एकूण ५०९ केंद्रांपैकी १५० पेक्षा जास्त केंद्र संवेदनशील आहेत. त्यामुळे मतदानाची वेळ दुपारी ३ पर्यंतच राहणार आहे. ११२४ जागांसाठी २५७८ उमेदवार रिंगणात आहेत.

कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली व धानोरा तालुक्यातील ४९९ मतदान केंद्र आणि १० सहाय्यकारी मतदान केंद्र मिळून ५०९ मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडणार आहे. या सहा तालुक्यातील १७० ग्रामपंचायतींमधील २ लाख ३१ हजार ४८९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १ लाख १४ हजार २३५ महिला, तर १ लाख १७ हजार २५४ पुरूष मतदार आहेत.

या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाकडून २६२२ कर्मचारी आणि अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. हे सर्व कर्मचारी मतदान केंद्रांवर आवश्यक साहित्य घेऊन पोहोचले आहेत. गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज तालुक्यात संवेदनशील नसलेल्या केंद्रांवर गुरुवारी तालुकास्थळावरून संबंधित कर्मचारी रवाना झाले.

अशी आहे निवडणूक

ग्रामपंचायत संख्या - १७०

एकूण सदस्यसंख्या- ११२४

रिंगणातील उमेदवार २५७८

एकूण मतदान केंद्र - ५०९

अधिकारी संख्या- ५२१

कर्मचारी संख्या- २१०१

------

तालुकानिहाय ग्रामपंचायती

कोरची- १४

कुरखेडा- ३९

देसाईगंज- १७

आरमोरी- २७

गडचिरोली - ४३

धानोरा- ३०

बिनविरोध गावे

कोरची- ४

कुरखेडा- १

आरमोरी- २

गडचिरोली- ४

धानोरा- २

-----

पोलीस बंदोबस्त

प्रत्येक निवडणुकीत नक्षलवाद्यांकडून आणले जाणारे अडथळे पाहता यावेळीही नक्षलवादी अडथळे आणण्याची शक्यता पाहून मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. जिल्हा पोलीस दलासह नक्षलविरोधी अभियानासाठी प्रशिक्षित पथके आणि राज्य व केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्याही निवडणूक बंदोबस्तात लागल्या आहेत. कोणत्याही आव्हानाला तोंड देत मतदान प्रक्रिया यशस्वी करण्याचा निश्चय पोलीस प्रशासनाने व्यक्त केला.

---

लोकशाही प्रक्रियेत निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. आपला प्रतिनिधी निवडण्याची ही संधी असते. या जिल्ह्यात निवडणुकांना मतदार नेहमीच चांगला प्रतिसाद देतात. यावेळी तो आणखी चांगला राहील, असा विश्वास आहे. संबंधित गावातील प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा.

- कल्पना नीळ

उपजिल्हा निवडणूक अधिकारी

----

संवेदनशील गावे

पहिल्या टप्प्यात ज्या ६ तालुक्यांमध्ये निवडणूक होत आहे, त्यापैकी कोरची, कुरखेडा, धानोरा या तालुक्यांमधील गावे नक्षलदृष्ट्या संवेदनशील आहेत. त्या गावांमधील मतदान केंद्रांवर पोहोचण्यासाठी बुधवारीच संबंधित कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टरने बेस कॅम्पवर नेऊन सोडण्यात आले. १५०पेक्षा जास्त केंद्र संवेदनशील असून, त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त राहणार आहे.

----

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता

कोरोना रुग्णांचे प्रमाण आता बरेच कमी झाले असले तरी मतदान प्रक्रियेदरम्यान विशेष काळजी घेतली जाणार आहे. कोरोनाची बाधा मतदान केंद्रांवरील कर्मचारी आणि मतदारांना होऊ नये म्हणून मास्क, सॅनिटायझरसह विशिष्ट अंतराच्या नियमांचे पालन सर्वांना करावे लागणार आहे. याशिवाय मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांना रवाना करण्यापूर्वी सर्वांची रॅपिड अँटिजेन कोरोना चाचणीही केली जात असल्याचे चित्र गुरुवारी सर्व तालुकास्थळी दिसत होते.

-----

२२ ला निकाल लागणार

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर दिनांक २२ला दोन्ही टप्प्यातील मतदानाची सर्व तालुकास्थळी मोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. तोपर्यंत सर्वांना प्रतीक्षा करावी लागेल.