शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांसाठी मतदार याद्या ‘अपडेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2022 22:02 IST

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कालावधी ९ नोव्हेंबर २०२२ (बुधवार) रोजीपर्यंत असेल. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी दिनांक ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर, विशेष मोहिमांचा कालावधी हा दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी निश्चित केल्यानुसार दिनांक १९ व २० नोव्हेंबर २०२२ तसेच ३ व ४ डिसेंबर २०२२ रोजी राहणार आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत इतर निवडणुकांसाठी मतदार याद्यांचे अद्यावतीकरण केले जाणार आहे. त्यामुळे नवमतदारांनाही आगामी निवडणुकांमध्ये मतदार करण्याची संधी मिळणार आहे. दि. १ जानेवारी, २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार याद्यांमध्ये नव्याने मतदारांचा समावेश केला जाणार आहे.विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कालावधी ९ नोव्हेंबर २०२२ (बुधवार) रोजीपर्यंत असेल. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी दिनांक ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर, विशेष मोहिमांचा कालावधी हा दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी निश्चित केल्यानुसार दिनांक १९ व २० नोव्हेंबर २०२२ तसेच ३ व ४ डिसेंबर २०२२ रोजी राहणार आहे. दावे, हरकती दि. २६ डिसेंबरपर्यंत निकालात काढून मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी दि. ५ जानेवारी, २०२३ रोजी केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी मिणा यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

प्रारूप यादी प्रकाशित, मतदारांनो माहिती तपासा दिनांक ९ नोव्हेंबर २०२२ रोजी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय तसेच सर्व मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप मतदार यादी प्रकाशित केलेली आहे. मतदारांनी आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदार संघ इ. तपशील मतदार यादीत तपासून ते अचूक आहेत का याची खात्री करणे आवश्यक आहे. बरेचदा ऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही, अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. त्यामुळे मतदारांनी प्रारूप मतदार यादीतील आपले तपशील आत्ताच तपासणे महत्त्वाचे आहे. दि. ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ हा कालावधी मतदार नोंदणीचा आहे, तसा तो एखाद्याच्या नावासंबंधी हरकती घेण्याचाही आहे. एखाद्या मतदारसंघातील एखादा मतदार, यादीत दिलेल्या पत्त्यावर राहत नसेल, तर अशा नावाबद्दल त्याच मतदारसंघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतो. मतदार नोंदणीसाठी पात्र युवांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवावे तसेच प्रत्येक मतदारांनी प्रारूप मतदार यादीतील आपले तपशील अचूक आहेत का याची खात्री करून घ्यावी, शिवाय मतदार नोंदणी, नाव वगळणी, तपशिलातील दुरुस्त्या संकेतस्थळावर आणि मोबाइल ॲपवर उपलब्ध आहेत, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय मीणा यांनी सांगितले.    

 चार टप्प्यांत करता येणार मतदार नोंदणी आतापर्यंत मतदार नोंदणीसाठी दि. १ जानेवारी हा अर्हता दिनांक असायचा. म्हणजे दि. १ जानेवारी किंवा त्याआधी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता यायची. मात्र २०२३ पासून भारत निवडणूक आयोगाने आता चार अर्हता दिनांक, अनुक्रमे १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै व १ ऑक्टोबर किंवा त्या आधी ज्या नागरिकांची १८ वर्षे पूर्ण होतील, त्यांना दि. ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या विशेष मोहिमेंतर्गत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे.

 

टॅग्स :Electionनिवडणूकcollectorजिल्हाधिकारी