शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
4
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
5
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
6
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
7
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
8
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
9
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
10
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
11
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
12
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
13
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
14
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
15
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
16
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
17
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
18
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
19
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला

विसापूर परिसर टँकरमुक्त होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 00:38 IST

गडचिरोली नगर पालिकेच्या हद्दीत येणाऱ्या विसापूर, विसापूर टोली परिसरात स्वतंत्र पाणीटाकी व नळ पाईपलाईनअभावी दरवर्षी उन्हाळ्यात टँकरने पाणी पुरवठा करावा लागत होता. मात्र पालिका प्रशासनाने सदर रखडलेल्या कामाची सर्व प्रक्रिया पार पाडून पाणी टाकी व पाईपलाईनच्या कामाला तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळवून घेतली आहे.

ठळक मुद्देनिविदा प्रक्रिया सुरू : पाणीटाकी व पाईपलाईनचे काम मंजूर

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली नगर पालिकेच्या हद्दीत येणाऱ्या विसापूर, विसापूर टोली परिसरात स्वतंत्र पाणीटाकी व नळ पाईपलाईनअभावी दरवर्षी उन्हाळ्यात टँकरने पाणी पुरवठा करावा लागत होता. मात्र पालिका प्रशासनाने सदर रखडलेल्या कामाची सर्व प्रक्रिया पार पाडून पाणी टाकी व पाईपलाईनच्या कामाला तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळवून घेतली आहे. एवढेच नाही तर निविदा प्रक्रियाही सुरू झाली अहे. त्यामुळे सदर काम पूर्ण झाल्यानंतर विसापूर व विसापूर टोलीचा परिसर टँकरमुक्त होणार आहे.विसापूर व विसापूर टोली येथील कुटुंबांसाठी वैशिष्ट्यपूर्ण निधीतून विसापूर व टोलीच्या मधात जि.प.शाळेच्या जागेवर पाच लाख लीटर क्षमतेची स्वतंत्र पाणीटाकी उभारण्यात येणार आहे. या भागात नळपाईप लाईनसुद्धा टाकण्यात येणार आहे. २ कोटी ७२ लाख रुपये खर्चातून हे काम होणार आहे. सदर कामाला ११ फेब्रुवारी २०१९ रोजी तांत्रिक मान्यता मिळाली असून २ मार्च २०१९ ला जिल्हा प्रशासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.गडचिरोली पालिकेची सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना वैनगंगा नदीच्या बोरमाळा नदीघाटावर कार्यान्वित करण्यात आली आहे. या नळ योजनेअंतर्गत गोकूलनगर, इंदिरा गांधी चौक, विवेकानंदनगर आदीसह एकूण सात जलकुंभ उभारण्यात आले आहे.दरवर्षीच्या उन्हाळ्यात विसापूर व विसापूर टोली भागात पाणीटंचाई जाणवत असल्याने या भागात स्वतंत्र पाणीटाकी व नव्याने नळ पाईपलाईनचे काम मंजूर करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी लावून धरली. दरम्यान पालिकेचे तत्कालीन पाणीपुरवठा सभापती केशव निंबोड यांनी सदर योजना मार्गी लावण्यासाठी शासन व प्रशासन दरबारी पाठपुरावा केला. नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मे २०१७ मध्ये भेट घेऊन विसापूरच्या पाणीटाकीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी २०१७ ला पाणीटाकीच्या कामासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून २ कोटी ७२ लाख रुपयांचा निधी पालिकेला उपलब्ध करून दिला.माजी पाणीपुरवठा सभापती निंबोड यांनी सदर योजनेचे काम मार्गी लावण्यासाठी महाराष्टÑ जीवन प्राधिकरण कार्यालय, चंद्रपूर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनेकदा पाठपुरावा केला. त्यानंतर पाच ते सहा महिने रखडलेल्या या योजनेचे काम अखेर मार्गी लागले. गडचिरोली पालिका प्रशासनाने सदर पाणीटाकी व नळ पाईपलाईन कामाची प्रक्रिया हाती घेतली असून येत्या दोन दिवसांत ही निविदा आॅनलाईन पाहता येणार आहे.निविदा बोलाविण्यात आले असून लोकसभा निवडणुकीनंतर कंत्राटदाराला वर्क आदेश देऊन कामाला प्रत्यक्ष सुरूवात करण्यात येणार आहे. सहा ते सात हजार इतक्या वाढीव लोकसंख्येला पाणी पुरणार, असे नियोजन करण्यात आले आहे.टिल्लूपंप व चढामुळे पाणी पोहोचेनादरवर्षीच्या उन्हाळ्यात वैनगंगा नदीची पातळी खालावते. त्यातच अनेक लोक नळाला टिल्लूपंप लावून पाणी खेचतात. परिणामी चढाचा भाग असलेल्या विसापूर, विसापूर टोली परिसरात पाणी पोहोचत नाही. त्यामुळे या भागात उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. गतवर्षी व त्यापूर्वीच्या तीन ते चार वर्ष विसापूर भागात उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला.विसापूर-पाथरगोटा पांदण रस्त्याचे काम मंजूरगडचिरोली नगर पालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून विसापूर-पाथरगोटा या पांदण रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले आहे. सदर रस्ता हा वैनगंगा नदीघाटाकडे जाणारा रस्ता आहे. तब्बल ५४ लाख रुपयांच्या निधीतून सदर रस्त्याचे काम होणार आहे. या कामासाठीची निविदा प्रक्रिया पालिकेने हाती घेतली असून या कामासाठी १० निविदा प्राप्त झाल्या असल्याची माहिती मिळाली आहे. प्राप्त निविदा उघडणे शिल्लक असून लोकसभा निवडणुकीनंतर या रस्त्याच्या कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांकडून मिळाली आहे. पाथरगोटा भागात अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन आहे. या रस्त्याचे काम झाल्यानंतर शेतकऱ्यांना सोयीचे होणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई