शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आंध्रप्रदेश - ओडिशा सीमेवर जहाल नक्षल नेता जगन, रमेश ठार

By संजय तिपाले | Updated: May 8, 2025 15:18 IST

जोरदार चकमक : दोघांवर होते २५ लाखांचे बक्षीस

संजय तिपालेगडचिरोली : छत्तीसगडमध्ये माओवाद्यांविरुध्द करेगुट्टा येथे २२ माओवाद्यांचा खात्मा केल्यानंतर आंध्रप्रदेश व ओडिशा सीमेवरील चकमकीत दोन जहाल माओवादी नेत्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आले. आंध्रप्रदेश- ओडिशा सीमेचा विशेष झोनल कमिटी सदस्य काकुरी पंडान्ना उर्फ जगन (६०) व केंद्रीय समिती सदस्य रमेश उर्फ वागा पोडियामी (५१) यांचा मृतांत समावेश आहे. 

करेगुट्टा येथे ७ मे रोजी जवान व माओवाद्यांत चकमक झाली. या धूमश्चक्रमीत २ माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. याचवेळी तिकडे आंध्रप्रदेश व ओडिशा सीमेवरील अल्लूरी सीतारामराजू  जिल्ह्यातील गुडेम कोठाविधी तालुक्याच्या दुमाकोंडा वनक्षेत्रात जवान व माओवाद्यांत जोरदार चकमक उडाली. यात २० लाख रुपयांच बक्षीस असलेला जगन व पाच लाखांचे बक्षीस असलेला रमेश या दोन जहान नक्षल नेत्यांना जवानांनी बंदुकीचा निशाणा ठरवले. घटनास्थळावरुन एके- ४७ सारखी घातक शस्त्रे जप्त केली आहेत. या परिसरात नक्षलविरोधी अभियान गतिमान करण्यात आले आहे.

 

चलपतीनंतर जगनवर होती जबाबदारी जानेवारी २०२५ मध्ये जहाल माओवादी नेता चलपती उर्फ रामचंद्र रेड्डी उर्फ जयराम याचा चकमकीत खात्मा करण्यात आला होता. मूळचा  आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील चलपतीच्या नेतृत्वाखाली छत्तीसगडसह ओडिशात अनेक नक्षल मोहिमा राबविण्यात आल्या होत्या.  त्याच्या मृत्यूनंतर सर्व जबाबदारी जगनच्या खांद्यावर आली होती. जगनसह अरुणा, गजरला रवी व इतर नेत्यांसह १५ हून अधिक माओवाद्यांचा एक गट बऱ्याच काळापासून आंध्रप्रदेश- ओडिशा सीमावर्ती भागातील जंगलात  फिरत होता. ही माहिती मिळाल्यावरुन जवानांनी मोहीम राबवली, यात जगन व रमेश या दोघांना ठार करण्यात यश आले. 

तेलंगणात माओवाद्यांच्या हल्ल्यात तीन जवान शहीदछत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील ५ हजार फूट उंच करेगुट्टा पहाडीवर २१ एप्रिलपासून सुरु असलेल्या ऑपरेशनमध्ये ७ मे रोजी २२ माओवाद्यांना ठार करण्यात आले होते. दरम्यान, नक्षलविरोधी अभियानादरम्यान तेलंगणात माओवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला. यात तेलंगणाचे तीन जवान शहीद झाले तर एक जवान जखमी आहे. ८ मे रोजी तेलंगणातील वाजेडू परिसरातील अभियानादरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले, त्यामुळे माओवादी पळून गेले. तेथे नक्षलविरोधी अभियान गतिमान केले असून ग्रेहाऊंडस पथके तैनात केली आहेत. 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली