शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलासाठी विनारॉयल्टी पाच ब्रास रेती देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 23:42 IST

आवास योजनेतील लाभार्थ्यांना कोणतीही रॉयाल्टी न आकारता घरकूल बांधकामासाठी रेती देण्याच्या सूचना सर्व तहसीलदारांना दिल्या आहेत. यामुळे कोणत्याही लाभार्थ्यांचे घरकूल बांधकाम थांबणार नाही, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसंवाद’ अंतर्गत लाभार्थ्यांना दिली.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांची माहिती : व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गडचिरोलीतील लाभार्थ्यांशी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आवास योजनेतील लाभार्थ्यांना कोणतीही रॉयाल्टी न आकारता घरकूल बांधकामासाठी रेती देण्याच्या सूचना सर्व तहसीलदारांना दिल्या आहेत. यामुळे कोणत्याही लाभार्थ्यांचे घरकूल बांधकाम थांबणार नाही, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसंवाद’ अंतर्गत लाभार्थ्यांना दिली.मुख्यमंत्री आणि विविध योजनांचे लाभार्थी यांच्यात थेट संवाद घडविण्याऱ्या लोकसंवाद उपक्रमाला बुधवारपासून प्रारंभ झाला. पंतप्रधान आवास योजना तसेच रमाई व शबरी आवास योजनेच्या विविध जिल्ह्यातील एकूण ५८९ लाभार्थ्यांनी या उपक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे सहभाग घेतला. गडचिरोली येथील एन.आय.सी. मधील कक्षातून जिल्ह्यातील १५ लाभार्थी यात सहभागी झाले. या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संवाद साधला.शासकीय योजनांचा लाभ घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी लाभार्थ्यांचे आभार मानले. तसेच प्रत्येकाची विचारपूस करून नव्या सूचना मांडण्याचे आवाहन केले. घरकुलासाठी शासनाने पारदर्शी पद्धत राबविली असून यामध्ये काही अडचणी असल्यास किंवा कोणी हेतूपुरस्पर अडचण निर्माण केल्यास लाभार्थ्यांनी थेट माहिती द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. घरकूल कामासोबच त्यांची कौटुंबिक माहितीही मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली. राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १२ लाख घर बांधकामाचे २०१९ पर्यंत नियोजन असून आतापर्यंत सहा लाख घरकुल बांधून पूर्ण झाली आहेत. उर्वरित सहा लाख घरकूल यावर्षात पूर्ण करण्याचा संकल्प असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. हक्काचे घर देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे मुख्यंमत्री म्हणाले.या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी एन.आय.सी.चे अधिकारी एस.आर.टेंभूर्णे व जिल्हाग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांनी सहकार्य केले. या लोकसंवादात नरेश महाडोळे, शमा जावेद शेख, महेंद्र बारापात्रे, हिरामण कोकोडे, लोमेशे धारणे, लहानु भोयर, ज्ञानेश्वर भोयर, रेमा गावडे, अशोक गावतुरे, ज्ञानेश्वर पेंदाम, लोकमित्र बारसागडे, बालाजी वाघरे, भागुबाई थोराक, केमन केसलापुरे, केदारनाथ रामटेके, दिपा उंदीरवाडे, गोविंदा वालदे, नरेश मेश्राम यांच्यासह अनेक लाभार्थी सहभागी झाले होते.घरकुलाचे स्वप्न ठरले खरेप्रधानमंत्री व रमाई आवास योजनेची गडचिरोली जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने आमच्या घरकुलाचे स्वप्न सत्यात उतरले, अशी प्रतिक्रिया सहभागी सर्वच लाभार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली. शासनाच्या या योजनेमुळे स्लॅबचे पक्के घर मिळाल्याची भावना अनेक लाभार्थ्यांनी व्यक्त केली. गोरगरीब व दुर्बल घटकातील जनतेला घरकूल मिळाल्याने अनेक लाभार्थ्यांनी शासनाचे यावेळी आभार मानले. काही लाभार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना घरकूल बांधकामातील अडचणीही यावेळी सांगितल्या.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्री