शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

लोहखनिज नेणारे तीन ट्रक ग्रामस्थांनी रोखले

By admin | Updated: April 6, 2016 01:06 IST

तालुक्यातील सूरजागड पहाडीवरील लोहखनिजाची अवैधरित्या वाहतूक करणारे तीन ट्रक ग्रामस्थांनी मंगळवारी ...

महसूल विभागाची कारवाई : सूरजागड पहाडीतून सुरू होती लोहखनिजाची अवैध वाहतूकएटापल्ली : तालुक्यातील सूरजागड पहाडीवरील लोहखनिजाची अवैधरित्या वाहतूक करणारे तीन ट्रक ग्रामस्थांनी मंगळवारी सायंकाळी ६ वाजता वन विभागाच्या नाक्याजवळ पकडले. त्यानंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर येऊन ट्रक जप्तीची कारवाई केली. मागील १५ दिवसांपासून लापडस मेटल या कंपनीने हेडरीपासून लोहखनिज पहाडीपर्यंत रस्ता बनविण्याच्या कामाला सुरुवात केली. रस्त्याचे काम जोरात सुरू असतानाच सोमवारी या कंपनीने कमालीची गोपनीयता बाळगून एमएच-३१-सीबी-७७७९, एमएच-३४-एबी-९८७, एमएच-३४-एबी-८९६५ या क्रमांकाच्या तीन ट्रकने पहाडीवरून लोहखनिज वाहतूक सुरू केली. याची माहिती मिळताच रवी रामगुंडेवार, जनहितवादी संघटनेचे अध्यक्ष सुरेश बारसागडे यांनी तत्काळ नाक्यावर जाऊन चौकशी केली. संबंधित ट्रक चालकाकडे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागाचे खनिज वाहतूक परवाना आढळून आला. तसेच खनिज पट्टाधारक म्हणून मेटल अ‍ॅण्ड इंजिनिअर्स याचा उल्लेख होता. त्यांच्याकडील टीपीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म विभागाचा शिक्काही आढळून आला. त्यानंतर नाक्यावर जमलेल्या नागरिकांनी लोहखनिज दगडांनी भरलेले तिन्ही ट्रक सायंकाळी दोन तास रोखून धरले. कंपनीचे अधिकारी आले नाही. मात्र माहिती मिळताच एटापल्लीचे तहसीलदार संपत खलाटे यांनी घटनास्थळी भेट दिली. आंदोलनादरम्यान येथील लोहखनिज नेऊ देणार नाही, असे आश्वासन लोकप्रतिनिधींनी दिले होते. टिपीमध्ये सदर लोहखनिज कुठे नेण्यात येत आहे, याचा उल्लेख नसल्याने सदर ट्रकची चौकशी करण्यात येईल, असे तहसीलदार खलाटे यांनी सांगितले. तर शासनाने वाहतूक परवाना दिल्यामुळे सदर ट्रक थांबविण्याचे आम्हाला अधिकार नाही, असे एटापल्लीचे वनपरिक्षेत्राधिकारी मडावी यांनी लोकमतला सांगितले. (प्रतिनिधी)