कृषी सहायक पदावर असताना विजय पत्रे यांनी पीक व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण उपाययोजना, नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक शेतीपद्धती, गट शेती, बहुपीक पद्धती, पिकाची फेरपालट, शेतमालाचे मूल्यवर्धन, शेतीला प्रक्रिया उद्योगाची जोड, शेतीपूरक व्यवसाय, सेंद्रिय शेती, फलोत्पादित पीक क्षेत्रवाढीची गरज, सूक्ष्म सिंचन आवश्यकता, आदी विषयांकित मार्गदर्शनाचे काम अत्यंत प्रभावीपणे केले. शेतकऱ्यांना लाभलेले त्यांचे सहकार्य लक्षात घेऊन जैरामपूर सज्जातील शेतकऱ्यांनी कृषी पर्यवेक्षक विजय पत्रे यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य माधवराव परसोडे, जैरामपूरच्या सरपंच दीपाली सोयाम, माजी सरपंच अंकुश शेडमाके, फकिरा ठेंगणे, ग्रा. पं. सदस्य अविनाश तोटपल्लीवार, नरेंद्र धानोरकर, प्रगतशील शेतकरी सतीश ताजणे, संतोष गौरकार, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष वासुदेव दिवसे, रमेश भसारकर, ग्रामसेवक श्रीमान पंधरे, मुख्याध्यापक कोहपर, वर्धलवार, आदी मान्यवर उपस्थित हाेते. जैरामपूर, बम्हणीदेव, मुधोली रिठ, मुधोली चक नं. १ गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. संचालन देवतळे यांनी केले. यशस्वीतेसाठी साईनाथ ताजणे, प्रकाश गौरकार, रितेश आसमवार, दीपक कुसराम व सुधाकर राऊत यांनी सहकार्य केले.
विजय पत्रे यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:05 IST