शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विहीरगाव शाळा बनली डिजिटल

By admin | Updated: February 8, 2017 02:38 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील विहीरगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लोकवर्गणीतून डिजिटल बनली आहे.

उद्घाटन कार्यक्रम : प्रगत शैक्षणिक उपक्रमात सातत्य ठेवण्याचे आवाहन गडचिरोली : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील विहीरगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लोकवर्गणीतून डिजिटल बनली आहे. या डिजिटल शाळेचे उद्घाटन मंगळवारी सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी (प्राथ.) माणिक साखरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संवर्ग विकास अधिकारी पचारे होते. प्रमुख अतिथी म्हणून विहीरगावच्या सरपंच विद्या सातपुते, गटशिक्षणाधिकारी उद्धव डांगे, केंद्रप्रमुख दुष्यंत तुरे, माजी सरपंच भक्तदास नवघरे, गुरवळा शाळेचे मुख्याध्यापक सय्यद, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष केशव वैरागडे, प्रियंका दळवी, विहीरगाव शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम दडगेलवार, ग्रामसेवक हेमंत गेडाम, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष देवेंद्र भोयर, मोरेश्वर करपते, ग्रा. पं. सदस्य जीजा सिडाम, लोमेश मानापुरे, पुरूषोत्तम कुनघाडकर, सोनुजी कुनघाडकर, शीला मानापुरे, सैैदुल खान पठाण, टुमदेव नवघरे, जितेंद्र शेंडे, ढाकराम चलाख आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी माणिक साखरे यांचा शाल व श्रीफळ देऊन शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना शिक्षणाधिकारी साखरे म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. १ हजार ५५६ शाळांपैकी १६० शाळा डिजिटल बनल्या आहेत. यामध्ये गडचिरोली पं. स. तील ५६ शाळांचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक केंद्रप्रमुख दुष्यंत तुरे, संचालन रायपुरे यांनी केले तर आभार प्रभारी मुख्याध्यापक दडगेलवार यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)