शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
3
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
4
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
5
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
6
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
7
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
8
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
9
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
10
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
11
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
12
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
13
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
14
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
16
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?
17
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
18
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
19
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
20
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश

विदर्भवाद्यांचे जिल्हाभरात आत्मक्लेष आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 05:00 IST

विदर्भ राज्य आंदोलन समिती नागपूरच्या आदेशान्वये कुरखेडा येथे तहसील कार्यालयासमोर मंगळवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खेडेगाव, हेटीनगर, कुरखेडा, नान्ही, पुराडा परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनाचे नेतृत्व रामचंद्र रोकडे, हेमलता भैसारे, मुत्ताजी दुर्गे, ज्ञानचंद सहारे, रमेश मानकर, घिसू खुणे, राजेंद्रसिंह ठाकूर, तुकाराम कवडो, वासुदेव किंचक, बुधराम साहाळा, शरद बन्सोड, किसनलाल साहाळा, दादाजी दरवडे आदी हजर होते.

ठळक मुद्देस्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी : शेतकऱ्यांचे कृषिपंपाचे वीज बिल माफ करा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/कुरखेडा : स्वतंत्र विदर्भ राज्य स्थापन करावे या मुख्य मागणीसाठी विदर्भवादी नेत्यांनी गडचिरोली, कुरखेडा तसेच इतरही तालुकास्तरावर मंगळवारी आत्मक्लेष आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले.विदर्भात मोठ्या प्रमाणात साधनसंपत्ती आहे. या साधनसंपत्तीच्या बळावर विदर्भ हे आर्थिकदृष्ट्या संपन्न राज्य होऊ शकते. महाराष्टÑ शासन विदर्भावर सातत्याने अन्याय करीत आला आहे. विदर्भात विजेची निर्मिती होत असतानाही या ठिकाणी भारनियमन केले जाते. भारनियमन बंद करून शेती पंपाला २४ तास पूर्ण दाबाची वीज द्यावी. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ३० हजार रुपये व फळबागेसाठी ५० हजार रुपये एकरी नुकसानभरपाई द्यावी. संपूर्ण शेतकºयांचे कृषिपंपाचे बिल माफ करावे. तरूणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. शासकीय धान खरेदी केंद्रांची संख्या वाढवावी आदी मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने जिल्हाभरात मंगळवारी आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले. गडचिरोली येथील आंदोलनात जिल्हा समन्वयक अरूण मुनघाटे, जिल्हा उपाध्यक्ष रमेश उप्पलवार, पंडित पुडके, पांडुरंग घोटेकर, चंद्रशेखर जक्कनवार, दत्तात्रय पाचभाई, नारायण मस्के, प्रमोद टोपरे, सुधाकर डोईजड, एकनाथ नंदेश्वर, कमलाकर वाळके, गुरूदेव भोपये, रमेश भुरसे, देवाजी सोनटक्के, सिद्धार्थ नंदेश्वर, भास्कर कोडापे, तुळशिदास भांडेकर, उद्धव डांगे, गोविंदराव बानबले आदी हजर होते. आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री व पंतप्रधानांना पाठविण्यात आले. आंदोलनात जिल्हाभरातील शेकडो नागरिक सहभागी होऊन स्वतंत्र विदर्भासाठी घोषणा दिल्या.कुरखेडा व मुलचेरातही आंदोलनविदर्भ राज्य आंदोलन समिती नागपूरच्या आदेशान्वये कुरखेडा येथे तहसील कार्यालयासमोर मंगळवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खेडेगाव, हेटीनगर, कुरखेडा, नान्ही, पुराडा परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनाचे नेतृत्व रामचंद्र रोकडे, हेमलता भैसारे, मुत्ताजी दुर्गे, ज्ञानचंद सहारे, रमेश मानकर, घिसू खुणे, राजेंद्रसिंह ठाकूर, तुकाराम कवडो, वासुदेव किंचक, बुधराम साहाळा, शरद बन्सोड, किसनलाल साहाळा, दादाजी दरवडे आदी हजर होते.मुलचेरातील आंदोलनात बादलचंद्र शाहा, उमेश पेळूकर, नगराध्यक्ष दीपक परचाके, प्राचार्य रणजीत मंडल, गणेश गरघाटे, गणपत मडावी, दिवाकर पेंदाम, गणेश बंकावार, नरेंद्र पेडूकर, प्रफुल दुर्गे, दिलीप आत्राम, सुभाष आत्राम, आकाश तुरनकर, प्रा.विठ्ठल निकुले, गुलशन मालमपल्ली, शुभम शेंडे, मनीष कडते, दादाजी सिडाम, मारोती वेलादी, कृष्णा तरमलवार आदी हजर होते. आंदोलनानंतर मंडळ अधिकाºयांना निवेदन दिले.

टॅग्स :Socialसामाजिक