शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

विदर्भवाद्यांची नागपुरात धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 01:33 IST

वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी ४ जुलै रोजी नागपूर बंद पाळला जाणार आहे. ४ जुलैपासून नागपूर येथे पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. विदर्भ राज्याच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले जाणार आहे,...

ठळक मुद्दे४ जुलैला नागपूर बंद : विदर्भ राज्य आंदोलन समितीची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी ४ जुलै रोजी नागपूर बंद पाळला जाणार आहे. ४ जुलैपासून नागपूर येथे पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. विदर्भ राज्याच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा समन्वयक अरूण मुनघाटे यांनी दिली.भाजप सरकारने सत्ते येण्यापूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेत आल्यानंतर सरकारला आश्वासनाचा विसर पडला आहे. महाराष्टÑात राहून विदर्भाचा विकास होणे शक्य नाही. विदर्भाचा विकास करायचा असेल तर स्वतंत्र राज्य होणे आवश्यक आहे. स्वतंत्र विदर्भासाठी विदर्भातील जनतेने आजपर्यंत अनेकवेळा शांततेच्या मार्गाने आंदोलन केले आहे. विदर्भाची मागणी आता निर्णायक स्थितीत पोहोचली आहे. मुख्यमंत्री व इतर प्रमुख खात्यांचे मंत्री विदर्भातीलच असताना सुद्धा विदर्भाची समस्या सुटली नाही. विदर्भात एकही नवीन मोठा उद्योग निर्माण झाला नाही. त्यामुळे बेरोजगारीची समस्या कायम आहे. ४ जुलैपासून नागपूर येथे पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशन होत आहे. यासाठी संपूर्ण मंत्री, आमदार नागपुरात येणार आहेत.सरकारला आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी नागपूर बंद ठेवला जाणार आहे, अशी माहिती मुनघाटे यांनी दिली. पत्रकार परिषदेला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी तथा माजी आ.डॉ.रमेश गजबे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र ठाकूर, समया पसुला, रमेश भुरसे, सुरेश बारसागडे, पांडुरंग घोटेकर, भास्कर बुरे उपस्थित होते.

टॅग्स :Vidarbhaविदर्भ