शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

रिक्त पदांमुळे पशुवैद्यकीय सेवा अस्थिपंजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 05:00 IST

चामोर्शी तालुक्याच्या पशुवैद्यकीय विभागात अनेक पदे रिक्त असल्याने पशुवैद्यकीय दवाखाने थातुरमारतूर सुरू आहेत. तालुक्यातील काही गावांमध्ये जनावरांना लम्पी आजाराने ग्रासले आहे. मागील महिन्यात या आजाराने थैमान घातले होते. पशुसंवर्धन विभागामार्फत पाळीव जनावरांना रोगप्रतिबंधक लस, तपासणी व खच्चीकरण, गर्भधारणा तपासणी, वंधत्व तपासणी करण्यात येते.

ठळक मुद्देपशुपालक त्रस्त : तीन ठिकाणचे पशुवैद्यकीय दवाखाने नियमित उघडत नाही; फिरते पथक कागदोपत्री

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : तालुक्यातील जनावरांच्या आरोग्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्याची निर्मिती करण्यात आली. मात्र तालुक्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे १६ पदे मंजूर आहेत. यापैैकी एकच पशुवैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. तब्बल १५ पदे रिक्त असल्याने तालुक्यातील पशुवैद्यकीय सेवा पूर्णत: ढासळली आहे. तसेच जनावरांचे आरोग्य धोेक्यात आले आहे.चामोर्शी तालुक्यात पशुवैद्यकीय पर्यवेक्षकांची एकूण ११ पदे मंजूर आहेत. दोन पर्यवेक्षकांची बदली झाल्याने चार पदे रिक्त आहेत. पशुपट्टीबंधकाची एकूण सहा पदे मंजूर आहेत. यापैकी चार पदे भरण्यात आली असून दोन पदे रिक्त आहेत. परिचराच्या २४ पदे मंजूर आहेत. यापैकी २१ पदे भरण्यात आली असून तीन पदे रिक्त आहेत.तालुक्यातील तुंबडी, जामगिरी, वायगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात परिचर नसल्याने पशुवैद्यकीय दवाखाने उघडतच नाही. फिरत्या पथकाला वाहन नसल्याने त्यांची सेवा थंडबस्त्यात असून हे फिरते पथक कागदावर दिसून येते.चामोर्शी तालुक्याच्या पशुवैद्यकीय विभागात अनेक पदे रिक्त असल्याने पशुवैद्यकीय दवाखाने थातुरमारतूर सुरू आहेत. तालुक्यातील काही गावांमध्ये जनावरांना लम्पी आजाराने ग्रासले आहे. मागील महिन्यात या आजाराने थैमान घातले होते. पशुसंवर्धन विभागामार्फत पाळीव जनावरांना रोगप्रतिबंधक लस, तपासणी व खच्चीकरण, गर्भधारणा तपासणी, वंधत्व तपासणी करण्यात येते. पशुपालकांना दुधाळू जनावरांचे वाटप, शेळी वाटप, कुकुटपक्षी वाटप आदी योजना राबविण्याची जबाबदारी या विभागावर आहे. मात्र सदर योजनेची अंमलबजावणी करणारी यंत्रणा रिक्तपदाने खिळखिळी झाली असल्याने पशुपालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शासन व प्रशासनाने गतीने कार्यवाही करून चामोर्शी तालुक्यातील पशुवैद्यकीय सेवा बळकट करण्यासाठी रिक्तपदे भरावी, अशी मागणी पशुपालकांनी केली आहे.तालुक्यात २३ हजार पेक्षा अधिक पशुधनगडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी हा भौगोलिक क्षेत्रफळाने व लोकसंख्येने सर्वात मोठा तालुका आहे. १९ व्या पशुगणनेनुसार गायवर्ग ६७ हजार ७५१, म्हैसवर्ग ७ हजार ६९५ , मेंढ्या ३ हजार ५३५, शेळ्या २३ हजार ३२३, कुकुटपक्षी ९४ हजार ८२३, इतर २ हजार २५७, एकूण १ लाख ९९ हजार ३८४ इतकी आहे. तसेच जि. प. स्तर अंतर्गत पैदास सक्षम संकरित ५८५ देशी, गावठी गायी १८ हजार ५९३, म्हैस ४ हजार ४२३, एकूण २३ हजार ६०४ आहे. जि.प.अंतर्गत श्रेणी १ चे १४ व श्रेणी २ चे ५ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. आष्टी येथे फिरते चिकित्सालय व चामोर्शी येथे राज्य शासनाचे लघु पशुचिकित्सालय आहेत. तालुक्यात एकूण २१ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत.जनावरांवरील लम्पी त्वचेचा आजार आटोक्यात आणण्यासाठी महिनाभरापूर्वी नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यात लम्पी आजार बºयापैकी नियंत्रणात आहे. रिक्तपदांबाबत आपण शासनाला अनेकवेळा पत्र व्यवहार करून पदे भरण्याची मागणी केली आहे. तसा ठरावही जिल्हा परिषदेच्या सभेत पारित करण्यात आला आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यात औषधींचा पुरवठा करण्यात येईल.- प्रा.रमेश बारसागडे,कृषी व पशुसंवर्धन सभापती, जि.प.गडचिरोली