शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पहिल्याच दिवशी मार्कंडात उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 22:20 IST

शिवरात्रीनिमित्त चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव येथे १० दिवसांची जत्रा भरत आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी मार्र्कंडादेव येथे मोठी गर्दी उसळली. मार्र्कंडादेव येथील रस्ते यात्रेकरूंनी भरून गेले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक वैनगंगा नदीतून येतात. त्यामुळे नदीतही जत्रेचे स्वरूप बघायला मिळत होते.

ठळक मुद्दे‘हर हर महादेव’चा गजर : अर्धा किमी अंतरावरच थांबविली जात होती वाहने, १० दिवस चालणार जत्रा

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी/मार्र्कंडादेव : शिवरात्रीनिमित्त चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव येथे १० दिवसांची जत्रा भरत आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी मार्र्कंडादेव येथे मोठी गर्दी उसळली. मार्र्कंडादेव येथील रस्ते यात्रेकरूंनी भरून गेले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक वैनगंगा नदीतून येतात. त्यामुळे नदीतही जत्रेचे स्वरूप बघायला मिळत होते.मार्र्कंडादेव येथे हेमाडपंथी अतिशय प्राचिन मंदिर आहे. मार्र्कंडेश्वराचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांबरोबरच पर्यटकही वर्षभर मार्र्कंडादेव येथे भेट देत राहतात. महाशिवरात्रीनिमित्त गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी जत्रा भरतात. मात्र मार्र्कंडा येथील जत्रा सर्वात मोठी जत्रा आहे.या जत्रेला चंद्रपूर, गडचिरोली जिल्हा, तेलंगणा व छत्तीसगड राज्यातील लाखो भाविक येतात. महाशिवरात्रीपासून पुढील पाच दिवस या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी उसळते. मार्र्कंडेश्वराची जत्रा जवळपास दीड किमी अंतरावर पसरली राहते. अनेक नागरिक चारचाकी व दुचाकी वाहनांनी येतात. वाहनांची गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी चारचाकी व दुचाकी वाहनांच्या पार्र्किंगची व्यवस्था मार्र्कंडापासून अर्धा किमी अंतरावर करण्यात आली आहे. यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी मनोरंजनाची विविध साधने आली आहेत. मनोरंजनाच्या साधनांजवळच मोठी गर्दी दिसून येत होती. स्वच्छता, पाणी व्यवस्था, वाहतूक व्यवस्था निट राहिल, यासाठी प्रशासनाने पूर्व नियोजन केले असल्याने पहिल्या दिवशी कोणतीही अनुचित घटना घडली नाही.महाशिवरात्रीनिमित्त सोमवारी भामरागडनजीकच्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नानासाठी परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती. स्नानानंतर भाविकांनी महादेवाची पूजा-अर्चा केली.पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती या नद्यांचा त्रिवेणी संगम भामरागडनजीक आहे. भामरागडनजीकच्या त्रिवेणी संगमाजवळ कोणतेही देवस्थान नाही. परंतु तालुक्यातील ८८ टक्के लोक या संगमावर येऊन महाशिवरात्रीच्या काळात पवित्र स्नान करून मनोभावे पूजाअर्चा करतात. सोमवारी या संगमावर खुप दूरवरून शेकडो भाविक आले होते. येथे पूजा-अर्चा केल्यानंतर जंगलात वनभोजनाचा आस्वाद घेतला. येथील समुह निवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनीही सुटीवर न जाता सदर त्रिवेणी संगमावर सहल आणून पवित्र स्नानाचा आस्वाद घेतला. सदर त्रिवेणी संगमावर आणखी तीन ते चार दिवस भक्तांची आंघोळीसाठी गर्दी होणार आहे.लोकप्रतिनिधींच्या हस्ते पार पडली महापूजामहाशिवरात्रीनिमित्त पहाटे ४ वाजेपासून शिवपिंडीची महापूजा करण्यात आली. मार्र्कंडेश्वर मंदिराच्या मुख्य गाभाºयात अभिषेक करण्यात आला. महापुजेचे मानकरी होण्याचा मान खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, बिनाराणी होळी दाम्पत्य, जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, मधुकर भांडेकर दाम्पत्य, पुजारी पंकज पांडे, शुभांगी पांडे दाम्पत्य, पराग आर्इंचवार, अमृता आर्इंचवार दाम्पत्य, पं.स. सभापती आनंद भांडेकर, वर्षा भांडेकर दाम्पत्य यांना देण्यात आला. यावेळी डॉ. भारत खटी, प्र.सो. गुंडावार, तहसीलदार अरूण येरचे, यांच्या पत्नी मंदाताई येरचे, संजय वडेट्टीवार, नेहा वडेट्टीवार, मार्र्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्यूंजय गायकवाड, मंगला भांडेकर, वैशाली भांडेकर, अमोल येगीनवार, दिवाकर नैताम, दिलीप चलाख, जयराम चलाख, उज्वल गायकवाड, पुजारी श्रीकांत पांडे, नाना आमगावकर, रामू गायकवाड, जि.प. सदस्य विद्या आभारे, रिकू पालारपवार आदी उपस्थित होते. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनीही सकाळच्या सुमारास मार्र्कंडादेव येथे येऊन मार्र्कंडेश्वराचे दर्शन घेतले.गोत्र पूजाही पार पडलीपहाटे ४ ते ६ वाजेपर्यंत महापूजा पार पडली. दर्शनाच्या रांगेत असलेले पहिले वारकरी मार्र्कंडादेव येथील जितेंद्र कोवे यांचा देवस्थान ट्रस्टच्या वतीने स्वागत करण्यात आला. सकाळी ६ वाजेपासून मार्र्कंडेश्वराचे दर्शन भाविकांसाठी सुरू करण्यात आले. पहिल्याच दिवशी लाखोंच्या संख्येने भाविक मार्र्कंडादेव येथे दाखल होऊन मार्र्कंडेश्वराचे दर्शन घेतले. मार्र्कंडेश्वराचे दर्शन घेण्यासाठी मोठी रांग लागली होती. आदिवासी बांधवांनी आदिवासी संस्कृतीनुसार गोत्र पूजा केली. सोमवारी रात्री आदिवासी बांधव एकत्र येऊन शंभू जागरण करणार आहेत. ढोलताशांच्या गजराने मार्र्कंडेश्वराची पूजा केली.