शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

वऱ्हाड्याच्या ट्रॅक्टरला ट्रकची धडक, वृद्धा ठार; दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 23:53 IST

ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत बसून गांगुली गावाला साक्षगंधासाठी जात असलेल्या वऱ्हाड्यांना समोरून येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक बसल्याने एक वृद्ध महिला ठार झाली तर ९ जण जखमी झाले. त्यापैकी दोघे गंभीर आहेत. हा अपघात कुरखेडा तालुक्याच्या कढोलीनजिक शुक्रवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडला.

ठळक मुद्देसाक्षगंधाच्या कार्यक्रमाला जाताना झाला घात

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत बसून गांगुली गावाला साक्षगंधासाठी जात असलेल्या वऱ्हाड्यांना समोरून येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक बसल्याने एक वृद्ध महिला ठार झाली तर ९ जण जखमी झाले. त्यापैकी दोघे गंभीर आहेत. हा अपघात कुरखेडा तालुक्याच्या कढोलीनजिक शुक्रवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडला.सुलोचना टिकाराम ठाकरे (६५) असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. याशिवाय टिकाराम सिताराम ठाकरे (७०) व वच्छला राऊत (६०) हे दोन वऱ्हाडी गंभीर जखमी आहेत. एमएच-३४-एबी-२५५० क्रमांकाच्या ट्रकने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. इतर जखमींमध्ये धनराज ठेंगरी (४२), सत्यभामा नक्टू ठेंगरा (६५), धर्मा नागो ठाकरे (७०) अनिकेत रामदास ठाकरे (१८), प्रतिभा रामदास ठाकरे (४५), प्रतीक गिरीधर ठाकरे (१२), प्रणाली गिरीधर ठाकरे (१६), सर्व राहणार कढोली आदींचा समावेश आहे. या अपघातात ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसलेले सगळेजण इतरत्र फेकल्या जाऊन ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली. या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच घटनास्थळावर गर्दी झाली. गंभीर जखमींना गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. इतर जखमींना कुरखेडाच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. कुरखेडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून ट्रॉलीत फसलेला वृद्ध महिलेचा मृतदेह बाहेर काढला.

टॅग्स :Accidentअपघात