शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

दारू विक्रेत्याचा तंमुस अध्यक्ष व पोलीस पाटलावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:34 IST

येथील अवैध दारू विक्रेत्यांच्या हातभट्टीवर आरमोरी पोलीस, तंमुस अध्यक्ष व पोलीस पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी धाड टाकून १० हजार रूपयांची दारू व मोहफुलाचा सडवा जप्त केला होता.

ठळक मुद्देआरोपीस अटक : वैरागड येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : येथील अवैध दारू विक्रेत्यांच्या हातभट्टीवर आरमोरी पोलीस, तंमुस अध्यक्ष व पोलीस पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी धाड टाकून १० हजार रूपयांची दारू व मोहफुलाचा सडवा जप्त केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी एका दारू विक्रेत्याने तंमुस अध्यक्ष व पोलीस पाटलावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता घडली.घटनेच्या दिवशी पोलीस पाटील गोरनाथ भानारकर हे आपल्या किराणा दुकानात बसून होते. आरोपीपैकी विलास गोविंदा धनकर याने मद्यंधूद अवस्थेत भानारकर यांना शिविगाळ करण्यास सुरूवात केली. रस्त्यावरची विट फेकून मारली. सदर विट भानारकर यांच्या छातीला लागल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. तेवढ्यात वैरागड येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष खुशाल सावरकर घटनास्थळी पोहोचले. विलास धनकर याने सावकर यांनाही विट फेकून मारली. त्यामुळे सावकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दोघांनाही आरमोरी येथील उपजिल्हा रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. घटनेची माहिती पोलीस पाटील भानारकर यांनी आरमोरी पोलिसांना दिले. आरोपीला आरमोरी पोलिसांनी अटक केली आहे. वैरागडचे बिट जमादार हे दारू विक्रेत्यांना प्रोत्साहन देत असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पोलीस अधीक्षक यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.