शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

वैरागडात खुलेआम चालतो दारू, जुगार, कोंबडबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 23:59 IST

आरमोरी पोलीस ठाण्याअंतर्गत येणारे वैरागड ही सर्वात मोठी ग्रामपंचायत असून या ठिकाणी पदवी व पद्व्युत्तर शिक्षणाची सुविधा आहे. मात्र गावात अवैध धंद्यांना उत आल्यामुळे वातावरण बिघडले आहे. वैरागड गावात दारू विक्री, जुगार व कोंबड बाजार आदी अवैध व्यवसाय खुलेआम सुरू आहे.

ठळक मुद्देपोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष : शिक्षण व शेतीचे काम सोडून युवक अवैध मार्गाकडे वळले

प्रदीप बोडणे ।लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : आरमोरी पोलीस ठाण्याअंतर्गत येणारे वैरागड ही सर्वात मोठी ग्रामपंचायत असून या ठिकाणी पदवी व पद्व्युत्तर शिक्षणाची सुविधा आहे. मात्र गावात अवैध धंद्यांना उत आल्यामुळे वातावरण बिघडले आहे. वैरागड गावात दारू विक्री, जुगार व कोंबड बाजार आदी अवैध व्यवसाय खुलेआम सुरू आहे. मात्र याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.जिल्ह्याच्या ग्रामीण भागात खरीप हंगाम आटोपला की साधारणत: दसरा सणानंतर काही गावांमध्य कोंबड बाजार भरविले जातात. पण वैरागड व परिसरातील गावांमध्ये वर्षभर कोंबड बाजार भरविला जात असून यात हजारो रुपयांचा जुगार खेळला जात आहे. मागील काही दिवसांपासून वैरागड येथील आठवडी बाजाराच्या जागेवर कृषी गोदामाच्या मागे प्रत्येक रविवार व बुधवारी कोंबड बाजार भरवून जुगार खेळला जातो. या ठिकाणी वैरागड व परिसरातील कोंबड शौकीन एकत्र येऊन कोंबड बाजाराचे नियोजन करतात. यात सुशिक्षीत तरूणांचाही सहभाग मोठा असतो. वैरागड येथील अवैध दारू विक्रीची स्थिती विकोपाला गेली असून येथील मच्छीपालन सहकारी संस्थेच्या मागे असलेल्या वार्डातील टोकावरील आठ ते दहा ठिकाणी दारू विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. तसेच जुना बसस्थानक परिसर तसेच वैरागड-चामोर्शी-ठाणेगाव मार्गावरही दारू विक्री केली जाते. याशिवाय गाठे मोहल्यातही काही घरी अवैध व्यवसाय चालतो.सध्या खरीपाचा हंगाम सुरू असल्याने मजुरांची नितांत गरज असते. मात्र अंग मेहनतीचे कामे सोडून अनेक युवक, वयोवृध्द नागरिक पानठेला व चायटपरीच्या आडोशाला बसून जुगार खेळत असतात. पोलिसांनी हे अवैध धंदे बंद करावे, अशी मागणी होत आहे.पाटणवाडा, मेंढेबोडीत तळीरामांची गर्दीआरमोरी पंचायत समिती अंतर्गत वैरागड गट ग्रामपंचायतीच्या हद्दित येणाऱ्या पाटणवाडा, मेंढेबोडी या ठिकाणी दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दररोज सायंकाळच्या वेळी या दोन्ही गावात दारू मिळत असलेल्या ठिकाणी तळीरामांची गर्दी दिसून येते. वैरागड, पाटणवाडा, मेंढेबोडी या तीन गावात देशी, विदेशी मोहफूल दारू विक्रीस गेल्या काही दिवसांपासून उधाण आले आहे. अवैध दारू विक्रीमुळे या गावातील महिलांना त्रास होत आहे. दारूमुळे समाजिक सलोखा धोक्यात आला आहे. सातत्याने मागणी करूनही कारवाई शुन्य असल्याचे दिसून येते.

टॅग्स :liquor banदारूबंदी