शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
2
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
3
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
5
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
6
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
7
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
9
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
10
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
11
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
12
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
13
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
14
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
15
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
16
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
17
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
18
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
19
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
20
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल

महाशिवरात्रीच्या जत्रांना लसीकरणाचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2022 05:00 IST

लसीकरणाबाबत कोविडबाबत सूट देणेकरिता राज्य शासनाच्या सूचना आहेत. सदर यादीनुसार गडचिरोली जिल्हा परिशिष्ठ ‘अ’मध्ये समाविष्ट नाही. सद्य:स्थितीत जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी दिसून येत असली महाशिवरात्रीनिमित्त जत्रा भरल्यास मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होऊन कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता आहे. सर्वसामान्य जनतेस व त्यांच्या आरोग्यास हानिकारक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लाेकमत न्यूज नेटवर्क । गडचिरोली : लसीकरणाच्या मापदंडानुसार राज्यातील जिल्ह्यांचे वर्गीकरण करण्यात येते. ज्या जिल्ह्यांमध्ये १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पात्र लोकसंख्येचे काेराेना लसीकरणाचे पहिल्या डोसचे प्रमाण ९० टक्केपेक्षा जास्त तसेच दोन्ही डोसचे प्रमाण ७० टक्केपेक्षा अधिक असल्यास ते जिल्हे परिशिष्ट ‘अ’ मध्ये समाविष्ट केले जातात. परिशिष्ट ‘अ’ मध्ये असलेल्या जिल्ह्याला निर्बंधांमध्ये अतिरिक्त शिथिलता देण्यात आलेली आहे. ही यादी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकृत माहितीनुसार लसीकरणाची टक्केवारी विचारात घेऊन दर आठवड्याला अद्ययावत केली जाते. गडचिराेली जिल्हा परिशिष्ट ‘अ’ मध्ये समाविष्ट नाही. त्यामुळे काेराेनाचे निर्बंध कायम आहेत. परिणामी जिल्हाधिकारी यांनी महाशिवरात्रीच्या जत्रांना परवानगी नाकारण्यात आली आहे. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर  महाशिवरात्रीनिमित्त भरणाऱ्या जिल्ह्यातील सर्व जत्रा रद्द केल्या आहेत. 

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष संजय मीणा यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. तथापि मंदिरामध्ये ५० लोकांच्या मर्यादेत धार्मिक कार्यक्रम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सदर आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित क्षेत्राचे उपविभागीय दंडाधिकारी व तहसीलदार यांना  देण्यात  आली  आहे.लसीकरणाबाबत कोविडबाबत सूट देणेकरिता राज्य शासनाच्या सूचना आहेत. सदर यादीनुसार गडचिरोली जिल्हा परिशिष्ठ ‘अ’मध्ये समाविष्ट नाही. सद्य:स्थितीत जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी दिसून येत असली महाशिवरात्रीनिमित्त जत्रा भरल्यास मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होऊन कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता आहे. सर्वसामान्य जनतेस व त्यांच्या आरोग्यास हानिकारक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महाशिवरात्रीनिमित्त भरणाऱ्या जत्रांवर बंदी घालण्यात आली आहे, असे आदेशात म्हटले आहे.  आदेशाचे पालन न करणारी  कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूहावर साथरोग प्रतिबंधक १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २०५५ तसेच भारतीय दंड संहिता १८६०  नुसार शिक्षेस पात्र ठरेल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीCorona vaccineकोरोनाची लस