शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

रिक्तपदाने शिक्षण क्षेत्रातील पर्यवेक्षिय यंत्रणा पांगळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:01 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत बाराही तालुक्यात मिळून जवळपास १५५० प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये पाच हजार शिक्षक कार्यरत आहेत. जिल्हास्तरावर जि.प.मध्ये शिक्षण विभाग असून या विभागामार्फत तालुक्यावर नियंत्रण ठेवले जाते. मात्र ग्रामीण, दुर्गम, अतिदुर्गम भागातील शाळा, तेथील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी गुणवत्ता यासह विविध शैक्षणिक बाबींवर तालुक्याची पर्यवेक्षिय यंत्रणा नियंत्रण ठेवत असते.

ठळक मुद्देशाळांवर परिणाम : प्रभारींच्या खांद्यावर नियंत्रण व तपासणीची जबाबदारी

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा स्तर व गुणवत्ता राखून ते टिकविण्याची जबाबदारी तालुकास्तरावरील या विभागाच्या अधिकाऱ्यांकडे आहे. मात्र रिक्त पदांमुळे शिक्षण विभागातील पर्यवेक्षिय यंत्रणा पांगळी झाली आहे. सदर पर्यवेक्षिय यंत्रणेतील ६५ पेक्षा अधिक पदे रिक्त असल्याने याचा परिणाम शाळांच्या नियंत्रणावर होत आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत बाराही तालुक्यात मिळून जवळपास १५५० प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये पाच हजार शिक्षक कार्यरत आहेत. जिल्हास्तरावर जि.प.मध्ये शिक्षण विभाग असून या विभागामार्फत तालुक्यावर नियंत्रण ठेवले जाते. मात्र ग्रामीण, दुर्गम, अतिदुर्गम भागातील शाळा, तेथील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी गुणवत्ता यासह विविध शैक्षणिक बाबींवर तालुक्याची पर्यवेक्षिय यंत्रणा नियंत्रण ठेवत असते. सदर पर्यवेक्षिय यंत्रणेमध्ये गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख आदींचा समावेश आहे.विशेष म्हणजे अहेरी उपविभागात गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांची अधिकाधिक पदे रिक्त असल्याने या भागातील जि.प.प्राथमिक शाळांच्या दर्जा व गुणवत्तेवर परिणाम होत आहे. गडचिरोली, धानोरा, भामरागड या तीनच पंचायत समितीस्तरावर नियमित गटशिक्षणाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. इतर नऊ तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांची जबाबदारी प्रभारी अधिकाºयाच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. विशेष करून अहेरी उपविभाग व उत्तर भागातील कोरची, कुरखेडा येथील पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभार शिक्षण विस्तार अधिकाºयांकडे सोपविण्यात आला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून गटशिक्षणाधिकारी पदाचा हा अनुशेष कायम आहे.जि.प.प्राथमिक शिक्षण विभागाअंतर्गत १२ तालुके मिळून शिक्षण विस्तार अधिकाºयांची एकूण ३१ पदे मंजूर आहेत. यापैकी १८ पदे भरण्यात आले असून १३ पदे रिक्त आहेत. रिक्तपदांमध्ये धानोरा, एटापल्ली, गडचिरोली येथील प्रत्येकी एक, आरमोरी तालुक्यात दोन, चामोर्शी दोन, अहेरी दोन व सिरोंचा तालुक्यातील चार पदांचा समावेश आहे. केंद्र प्रमुखांची पदे रिक्त असल्याने या पदाचा प्रभार ज्येष्ठ शिक्षक तसेच मुख्याध्यापकांकडे सोपविला जात असतो.केंद्रप्रमुखांची ४५ पदे रिक्तबाराही पंचायत समिती मिळून जिल्ह्यात केंद्रप्रमुखांची एकूण १०१ पदे मंजूर आहेत. यापैकी ५६ पदे भरण्यात आली असून ४५ पदे रिक्त आहेत. रिक्तपदांमध्ये सर्वाधिक अहेरी व सिरोंचा तालुक्यातील पदांचा समावेश आहे. चामोर्शी तालुक्यात आष्टी, गणपूर, गडचिरोली तालुक्यात मुरखळा, येवली, आंबेशिवणी, आरमोरी तालुक्यात डोंगरगाव, मोहझरी, आरमोरी, मुलचेरा तालुक्यात गांधीनगर, मुलचेरा, सुंदरनगर, कुरखेडा तालुक्यात कढोली, कोरची तालुक्यात देऊळभट्टी, बेतकाठी व कोरची तसेच धानोरा तालुक्यात येरकड, दुर्गापूर, मुरूमगाव, पेंढरी, एटापल्ली तालुक्यात गट्टा, कसनसूर, गेदा, कोटमी, एटापल्ली आणि भामरागड तालुक्यात लाहेरी, मन्नेराजाराम, भामरागड व नारगुंडा आदी ठिकाणची केंद्रप्रमुखांची पदे रिक्त आहेत.दुर्गम भागातील शाळा रामभरोसेअहेरी तालुक्यात अहेरी, देवलमरी, आलापल्ली, राजाराम, उमानूर, जिमलगट्टा, देचलीपेठा, पेरमिली, दामरंचा आदी नऊ ठिकाणची केंद्रप्रमुखांची पदे गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. तसेच सिरोंचा तालुक्यात सिरोंचा, आरडा, झिंगानूर, रंगय्यापल्ली, रेगुंठा, टेकडाताला, आसरअल्ली व नदीकुडा आदी आठ ठिकाणची केंद्रप्रमुखांची पदे रिक्त आहेत. स्वतंत्र केंद्रप्रमुख नसल्याने दुर्गम भागातील शाळांमधील सुविधा, तेथील गुणवत्ता व विकासाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पर्यवेक्षिय यंत्रणा या उपविभागात पांगळी असल्याने दुर्गम भागातील शाळा रामभरोसे आहेत. परिणामी अहेरी उपविभागातील अनेक शाळांचे शिक्षक आठवड्यातून एक ते दोन दिवस शाळेला दांडी मारतात. मात्र तपासणीच्या अहवालात सर्व व्यवस्थित दाखविले जाते.

टॅग्स :Socialसामाजिक