आष्टी येथील महात्मा जाेतिबा फुले महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत हाेते. याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डॉ. पंकज चव्हाण, प्राचार्य प्रमोद मंडल, प्रा.पी.के. सिंग उपस्थित होते. प्राचार्य डॉ. पी. आर. चव्हाण म्हणाले, विद्यार्थ्यांनी जीवनात शेवटपर्यंत ज्ञान प्राप्त करून स्वतः शिस्त लावून विश्वास निर्माण करावा. प्राचार्य पी. बी. मंडल यांनी विद्यार्थ्यांनी आधुनिक साधनांचा वापर योग्यरित्या करून समाजाच्या उपयोगासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करावा आणि राष्ट्र मोठे करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन केले. डॉ. पी. के. सिंग यांनी विद्यार्थ्यांनी कलाकौशल्य, स्पर्धा परीक्षा याद्वारे शासन व्यवस्थेमध्ये सहभागी होऊन समाजाच्या शेवटपर्यंत शासकीय योजना पोहोचवावे, असे मार्गदर्शन केले. दरम्यान, अनेक विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. संचालन प्रा. डॉ. भारत पांडे, प्रास्ताविक प्रा. डॉ. राज मुसने तर आभार प्रा. रवी गजभिये यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. रवी शास्त्रकार, प्रा.डॉ. गणेश खुणे, प्रा. श्याम कोरडे, प्रा. ज्योती बोबाटे, प्रा. विजया सालूरकर, प्रा. नाशिका गभणे यांनी सहकार्य केले.
प्राप्त ज्ञानाचा समाजासाठी उपयाेग करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:33 IST