शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

निराधार महिलेची घरकुलासाठी धडपड

By admin | Updated: July 22, 2016 01:31 IST

निराधार व दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्यांना शासनाच्यावतीने घरकूल योजनेचा लाभ दिला जातो.

पेट येथील कौशल्या येरेवार यांची व्यथा : दारिद्र्य रेषेखालील असूनही योजनेतून डावलले घोट : निराधार व दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्यांना शासनाच्यावतीने घरकूल योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेतून लाभार्थ्यांना घरकूल बांधकामासाठी पर्याप्त निधी स्थानिक प्रशासनाच्या पुढाकाराने पं. स. स्तरावरून उपलब्ध होतो. घरकूल लाभासाठी स्थानिक प्रशासनाचा महत्त्वाचा वाटा असतो. परंतु स्थानिक प्रशासनच निराधार व दारिद्र्य रेषेखालील लोकांना घरकूल लाभापासून डावलत असेल तर खऱ्या लाभार्थ्यांना न्याय कसा मिळणार, अशीच काहीशी स्थिती घोट ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या पेट येथे उघडकीस आली आहे. येथील निराधार व दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या कौशल्या सुधाकर येरेवार या घरकुलापासून वंचित आहेत. चामोर्शी तालुक्यातील घोट ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या पेट येथील कौशल्या येरेवार या मुलगा व मुलीसह झोपडीत जीवन व्यतीत करीत आहेत. शासनाकडून घरकूल मिळावा, याकरिता त्यांनी स्थानिक प्रशासनाकडे वारंवार अर्ज सादर केला. परंतु त्यांचे नाव बीपीएल यादीत असतांनाही योजनेच्या लाभापासून नेहमीच डावलण्यात आले. एक मुलगा व एक मुलगी यांचे पालन-पोषण त्या मोलमजुरीने करीत आहेत. ऊन, वारा, पाऊस, थंडीतही त्या झोपडीत जीवन कुंठीत करीत आहेत. दोन मुलांचा सांभाळ करण्यासाठी कष्टाची कामे करावी लागत आहेत. तर घरकूल बांधकामासाठी पैसा कुठून आणणार, असा सवाल त्या प्रशासनाला करीत आहेत. प्रशासनाच्या अनास्थेमुळे घरकुलाचा लाभ आपल्याला मिळाला नाही. दोन मुलांचा सांभाळ करताना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. तर निवाऱ्याची समस्या अधिकच गंभीर होत आहे. पावसाळ्यात सदर झोपडी कधीही कोसळू शकते. शासकीय कार्यालयात वारंवार चकरा मारून काहीच मिळाले नाही. त्यामुळे मोठ्या आशेने आपल्याकडे निवेदन सादर करीत आहे. तरी घरकुलाचा लाभ देऊन आपल्या स्तरावर उचित कार्यवाही करावी, अशी मागणी कौशल्या सुधाकर येरेवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. (वार्ताहर)