मार्च, एप्रिल, मे महिन्यांत अनेक कारणास्तव जंगलात सर्वाधिक आगी लागतात. वणव्यामुळे जैवविविधतेचे नुकसान मोठ्या प्रमाणात होते. नुकसान टाळण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू असतानादेखील ग्रामीण भागात मोहफुले वेचण्यासाठी लावलेली आग विस्तारित होऊन जंगल जळून खाक होत असते. त्यात वन व वन्यजीव मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मात्र, यावर्षी तालुक्यात अधूनमधून अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे जंगलात ओलसरपणामुळे वणवे लागले तरी विस्तार होणार नाही. जैवविविधतेचे नुकसान टळण्यास मदत झाली आहे. तसेच पावसामुळे पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या तेंदू व्यवसायाला प्रामुख्याने उत्तम दर्जाची पाने आवश्यक आहेत. अवकाळी पावसामुळे तेंदू झाडाला उत्तम दर्जाची पाने दिसून येत आहेत. वेळेवर पाने तोडायला सुरुवात होत नसेल तर किडे लागून मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अवकाळी पावसामुळे वन व वन्यप्राण्यांना मिळाली संजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:38 IST