शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

महाराष्ट्र- तेलंगणा सीमेवर साजरी झाली अनोखी राखीपौर्णिमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 07:18 IST

सततचे लॉकडाऊन आणि सीमाबंदीच्या मर्यादेमुळे अनेक भावा-बहिणींसाठी प्रत्यक्ष राखी बांधण्याचा प्रसंग यावर्षी अशक्य झाला. मात्र सर्व अडचणींवर मात करत महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर सोमवारी रंगलेल्या रक्षाबंधनाच्या सोहळ्याने कोरोनाच्या बंधनांवरही मात केल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देत्यांच्या रक्षाबंधनाने केली कोरोनाच्या बंधनांवर मातप्राणहिता नदीच्या पुलावरील चेकपोस्टवर रंगला सोहळा

कौसर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भावा-बहिणीतील उत्कट प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाच्या सणाला भावाच्या हातावर राखी बांधल्याशिवाय कोणत्याही बहिणीला चैन पडत नाही. हीच स्थिती भावाचीही असते. असे असले तरी कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे, सततचे लॉकडाऊन आणि सीमाबंदीच्या मर्यादेमुळे अनेक भावा-बहिणींसाठी प्रत्यक्ष राखी बांधण्याचा प्रसंग यावर्षी अशक्य झाला. मात्र सर्व अडचणींवर मात करत महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर सोमवारी रंगलेल्या रक्षाबंधनाच्या सोहळ्याने कोरोनाच्या बंधनांवरही मात केल्याचे दिसून आले.

सिरोंचा तालुक्याचे आणि प्राणहिता व गोदावरील नदीपलिकडील तेलंगणा राज्याचे रोटी-बेटीचे व्यवहार चालतात. त्यामुळे नदीच्या दोन तिरांवर राज्य आणि भाषा बदलत असली तरी दोन्ही प्रदेशात रक्ताचे नाते आहे. अनेक व्यवहारातही ते एकमेकांवर अवलंबून असतात. त्यांच्या या व्यवहारात आजपर्यंत कशाचीही आडकाठी आली नाही. पण गेल्या ४ महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सीमेपलिकडे जाणे-येणे जवळजवळ ठप्पच होते. यादरम्यान कोणतेही मोठे सण नसल्यामुळे लॉकडाऊनचा फारसा परिणाम त्यांच्या भावनिक नातेसंबंधांवर झाला नाही, मात्र रक्षबंधनाच्या सणाला भावाच्या हातावर राखी बांधायचीच, असा निश्चय करणाऱ्या अनेक बहिणी आणि तेवढ्याच निश्चयाने पुढे सरसावलेले त्यांचे भाऊ यांचा अनोखा मिलाप राज्य सीमेवरील प्राणहिता नदीवर सोमवारी झाला.

तेलंगणातल्या करीमनगर जिल्ह्यातून आलेले भाऊ आणि सिरोंचा तालुक्यातून आलेल्या बहिणी तर काही सिरोंचा तालुक्यातील भाऊ आणि तेलंगणा राज्यातील बहिणी सीमेवरील पोलीस चौकीत जमत होते. तिथेच भावाला राखी बांधून त्याचे तोंड करताच बहिणीच्या चेहºयावर अनोखे समाधान झळकत होते. याचवेळी भावाकडून मिळालेली प्रेमाची ओवाळणी लाखमोलाची असल्याचा आनंद बहिणींच्या चेहºयावर दिसत होता.

पोलीस जवानांनाही मिळाले बहिणीचे प्रेमआपल्या कुटुंबियांपासून कोसो दूर राहून कर्तव्य बजावणाºया सीमेवरील पोलीस जवानांनाही अनेक महिलांनी राख्या बांधून ‘तू सुद्धा आमचे रक्षण करणारा भाऊच आहेस’ असे म्हणत त्यांचेही तोंड गोड केले. यामुळे ते जवानही भावुक झाल्याचे जाणवत होते.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधन