लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : येथील विलगीकरणातील असुविधा व जेवण याबाबत लोकांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या. थातुरमातूर व्यवस्था करून वेळ मारून नेण्याचे काम प्रशासनाने केले. मात्र ठोस उपाययोजना केल्या नाही. सध्या येथील विलगीकरण कक्षात लोकांना अर्धवट शिजलेली पोळी, बेचव भाजी, हलक्या प्रतीच्या तांदळाचा भात जेवणात दिला जात आहे. मात्र या प्रकाराकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे.एटापल्ली येथील विलगीकरण कक्षातील असुविधांबाबत अनेकदा नागरिकांनी आंदोलन केले. तसेच सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ व्हायरल करून लक्ष वेधले होते. दरम्यान आयटीआयमधील विलगीकरण कक्ष बदलून आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात लोकांची व्यवस्था केली होती. तक्रारीनंतर जेवणात सुद्धा सुधारणा होईल, अशी अपेक्षा कक्षातील नागरिकांना होती. मात्र यात कुठल्याच प्रकारची सुधारणा झाली नाही. सध्या नागरिकांना हलक्या प्रतीच्या तांदळाचा भात अर्धवट शिजलेली पोळी, बेचव भाजी अशा प्रकारचे जेवण दिले जात आहे. मात्र नाईलाजास्तव काही नागरिक कक्षात मिळणारे जेवण घेत आहेत. तर अनेकजण स्वत:च्या घरून जेवणाचा डब्बा मागवत आहेत. योग्य जेवण द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. १६ जुलैला सायंकाळच्या सुमारास नागरिकांना अशाच प्रकारचे बेचव जेवण देण्यात आले, अशी तक्रार येथील नागरिकांनी केली. तसेच जेवणाच्या थाळीचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा केले.घरच्या डब्ब्यांमुळे कोरोनाचा धोकाएटापल्ली येथील विलगीकरण कक्षात लोकांना योग्य दर्जाचे जेवण मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अनेकजण घरून जेवणाचे डब्बे मागवत आहेत. विलगीकरण कक्षातील व्यक्ती पॉझिटीव्ह आढळून आल्यास संपर्कात येणाºया लोकांनाही त्याचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे कक्षातच उत्कृष्ट जेवणासाठी निविदा काढावी, अशी मागणी नागरिकांनी तालुका प्रशासनाकडे केली आहे.
बेचव भाजी व कच्ची पोळी लोकांच्या माथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:00 IST