शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी!  काळाने दिली हाक अन् ‘ते’ बसले बैलबंडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2022 21:40 IST

Gadchiroli News घरी लवकर जाता येईल या विचाराने पती पत्नी बैलबंडीवर बसले आणि अघटित घडले. अपघातात पत्नी जागीच ठार झाली.

गडचिरोली : शेतातून काम करून सायंकाळी घराकडे परत येत असताना वाटेत बैलबंडी भेटली. याच बैलबंडीची लिफ्ट शेतकरी दाम्पत्याने घेतली; परंतु ही लिफ्ट एवढी महागात पडेल, याची यत्किंचितही कल्पना त्यांना नव्हती. काळाने हाक दिल्याप्रमाणेच त्यांनी बैलबंडीचा आश्रय घेतला; परंतु मागून येणाऱ्या ट्रकने बैलबंडीला जाेरदार धडक दिल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती किरकाेळ जखमी झाला. ही घटना मुरूमगाव-धानाेरा मार्गावर मंगळवार, ३१ मे राेजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली

निर्मला सीताराम माेहुर्ले (५५, रा. नवा फलाट, धानाेरा) असे ठार झालेल्या शेतकरी महिलेचे नाव आहे. पेरणीपूर्व हंगामातील शेती मशागतीची कामे सुरू आहेत. शेतकरी सकाळी तसेच दुपारी अशा दाेन पाळीत शेतात कामे करीत आहेत. निर्मला व सीताराम हे शेतकरी दाम्पत्य आपल्या शेतात काम करण्यासाठी गेले हाेते. सायंकाळ हाेताच त्यांनी आपले काम आटाेपते घेतले व पायीच निघाले. दरम्यान, त्यांनी मार्गावरून जाणाऱ्या बैलबंडीचा आश्रय घेतला. परंतु त्यांना काय माहीत की आपण ‘काळा’च्या पाठीवर स्वार हाेऊन जात आहाेत. शेवटी काय तर याचवेळी मुरूमगाव मार्गाने धानाेराकडे येणाऱ्या ट्रकने बैलबंडीला सालेभट्टी गावाजवळील पुलालगतच्या वळणावर मागील बाजूने जाेरदार धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त हाेती की, सीताराम माेहुर्ले हे रस्त्याच्या पलीकडे उसळून पडले तर निर्मलाबाई रस्त्यावर काेसळल्या. त्यामुळे भरधाव ट्रक निर्मलाबाईंच्या अंगावरून गेला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

गंभीर अपघात झाल्याचे लक्षात येताच ट्रकचालक भरधाव वेगात ट्रकसह पसार झाला. या घटनेत सीताराम माेहुर्ले यांना किरकाेळ तर बैलबंडीचालकाला काहीच दुखापत झाली नाही. काळ आला म्हणूनच ते बैलबंडीवर बसले, असा भावनिक शाेक लाेकांनी व्यक्त केला.

टॅग्स :Accidentअपघात