शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

निवृत्त शिक्षक भरतीवरून बेरोजगारांनी व्यक्त केला रोष; आंदोलन करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 15:17 IST

गडचिरोलीत बैठक : ५ सप्टेंबरला तोंडाला काळ्याफिती बांधणार

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या कंत्राटी व तात्पुरत्या स्वरूपातील शिक्षक भरतीवर जिल्ह्यातील डी.एड. - बी.एड. झालेले बेरोजगार प्रचंड नाराज आहेत. यासंदर्भात पुढील दिशा ठरविण्यासाठी २७ ऑगस्ट रोजी येथील संविधान सभागृहात बेरोजगारांची सहविचार बैठक पार पडली. या सभेत ५ सप्टेंबर शिक्षकदिनी डोळ्यांवर काळ्याफिती लावून आंदोलन करण्याबाबत ठरविण्यात आले.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी धर्मानंद मेश्राम होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा कार्यकर्ते राज बन्सोड, विनोद मडावी, रेमाचंद निकुरे, अंकुश कोकोडे उपस्थित होते. सध्या चालू असलेल्या शिक्षक भरतीविषयी बेरोजगारांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष असून जिल्हा हा मागास जिल्हा आहेच; पण येथे रोजगारही दुर्मीळ होत आहे. अशातच शिक्षक भरतीमध्ये बेरोजगारांना डावलून सरकार निवृत्त शिक्षकांना सेवेत घेत आहे. 

इतर जिल्ह्यातील अर्ज मोठ्या प्रमाणात येत असल्याने जिल्ह्यातील युवकांवर अन्याय होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे बेरोजगार आता आक्रमक झाले असून जिल्हाभरातून पात्रताधारक बेरोजगार एकत्रित येऊन डी.एड. बी.एड. बेरोजगार संघटनेची स्थापना करून शासनासह मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांच्या विरोधात ५ सप्टेंबरला शिक्षकदिनी डोळ्यांवर काळ्या फिती बांधून आंदोलनाचा पहिला टप्पा सुरू करणार आहेत. आंदोलन तीव्र केले जाणार आहे.

जिल्ह्यातील बेरोजगार युवकांनी ५ सप्टेंबरच्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी जिल्ह्याच्या विविध भागातून आलेले बहुसंख्य बेरोजगार उपस्थित होते.

टीएआयटीची अट रद्द करावी बैठकीत निवृत्त शिक्षकांना रुजू न होऊ देण्यासाठी गावांगावात जाऊन ग्रामसभा व ग्रामपंचायतला ठराव घेण्यासाठी युवक आवाहन करणार आहेत. विशेष मागास जिल्हा म्हणून भरती प्रक्रियेत सीटीईटी व टीएआयटी परीक्षेची अट शिथिल करून जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य द्यावे. बाहेर जिल्ह्यातील उमेदवार घेऊ नयेत याकरिता लक्षवेधी लढा उभा करण्यात येईल, असे ठरविण्यात आले. 

... तर मतदानावर बहिष्कार टाकणार जिल्ह्यातील बेरोजगारांचा विचार न करता बाहेर जिल्ह्यातील उमेदवारांना घेण्यात येईल, तसेच सेवानिवृत्त शिक्षक भरती रद्द करण्यात आली नाही तर आगामी निवडणुकीत बेरोजगार युवक मतदानावर बहिष्कार टाकणार असा, इशारासुद्धा देण्यात आला.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीUnemploymentबेरोजगारी