गडचिरोली : स्थानिक जिल्हा व सत्र न्यायालयात तालुकास्तरावर शनिवारी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ३६ लाख १२ हजार ९२६ रूपयांची एकूण ३५ प्रकरणे आपसी समझोता व तडजोडीतून निकाली काढण्यात आली. गडचिरोली जिल्हा न्यायालयात शनिवारी घेण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये पॅनल प्रमुख म्हणून गडचिरोलीचे मुख्य न्यायदंडाधिकारी आर. बी. रेहपाडे होते. पॅनल सदस्य म्हणून जी. एम. बांगरे, सामाजिक कार्यकर्त्या व्ही. के. बांबोळे यांनी काम पाहिले. यावेळी गडचिरोली तालुक्यातील सर्व बँकांचे व्यवस्थापक उपस्थित होते. लोकअदालतीमध्ये दाखल झालेल्या प्रकरणांवर चर्चा करून आपसी समझोत्याने ३५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. न्यायालयाच्या वतीने दरवर्षी लोकअदालतीचे आयोजन करण्यात येते. या लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यात येतात. (स्थानिक प्रतिनिधी)१७ प्रकरणे निकाली४अहेरीच्या तालुका व सत्र न्यायालयात १३ फेब्रुवारी शनिवारला एटापल्ली, अहेरी व आलापल्ली भागातील प्रकरणांबाबत राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. यावेळी १८९ प्रकरणे दाखल करण्यात आली. ८९ हजार ७०० रूपयांच्या १७ प्रकरणांचा निपटारा आपसी सामंजस्य व तडजोडीद्वारे करण्यात आला. यावेळी पॅनल प्रमुख म्हणून न्यायाधीश डी. जे. खडतकर, अॅड. सतीश जैनवार व बँकांचे व्यवस्थापक उपस्थित होते.
तडजोडीतून ३५ प्रकरणे निकाली
By admin | Updated: February 16, 2016 03:11 IST