शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

अल्टीमेटम संपला, खड्डे कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 00:35 IST

गडचिरोली जिल्ह्यातील २० टक्के रस्त्यांवर अजुनही खड्डे कायम असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीवरून दिसून येते.

ठळक मुद्दे२७६ किमी मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य : १०७६ किमी रस्त्यांची बांधकाम विभागाने केली दुरूस्ती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील २० टक्के रस्त्यांवर अजुनही खड्डे कायम असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीवरून दिसून येते.जिल्ह्यात १०४१.२१ किमीचे राज्य मार्ग आहेत. त्यापैकी ६८२.०३ किमी मार्गावर खड्डे पडले होते. बांधकाम विभागाने ५७९.७३ किमीवरील खड्डे बुजविले आहेत. खड्डे बुजविण्याचे प्रमाण ८५ टक्के आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील ८६१.१२ किमीच्या प्रमुख जिल्हा मार्गापैकी ६७१.१२ किमी मार्गावर खड्डे पडले होते. त्यातील ४९६.६२ किमी मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले. जिल्हा मार्गावरील खड्डे बुजविण्याचे प्रमाण ७४ टक्के आहे. दोन्ही मार्गावरील खड्डे मिळून ८० टक्के खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण झाले आहे. दोन्ही मार्गाचे मिळून २० टक्के काम शिल्लक आहे. एकूण २७६.३६ किमी मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य कायम आहे.रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी राज्य शासनाने सुमारे २१ कोटी ६ लाख ६९ हजार रूपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी सार्वजनिक बांधकाम विभागाने ५ कोटी २६ लाख ७० हजार रूपये खड्डे बुजविण्यावर खर्च केले आहेत. राज्य शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाला निधीची कमतरता पडू दिली नाही. मात्र गडचिरोली जिल्ह्यात सुमारे १५ दिवस चाललेल्या नक्षल घटना व बंदमुळे कामाला गती मिळाली नाही. परिणामी बांधकाम विभागाला दिलेल्या अल्टीमेटममध्ये काम पूर्ण होऊ शकले नाही. ही बाब मान्य असली तरी पुढील १५ दिवसात खड्डेमुक्त रस्ते तयार करण्याचे आव्हान बांधकाम विभागासमोर आहे. अधिवेशनादरम्यान बांधकाम विभागाच्या खड्ड्यांचा आढावा घेतला गेला. कामाला गती मिळण्याची आशा आहे.नक्षल सप्ताहामुळे कामात अडचणगडचिरोली जिल्हा नक्षलदृष्ट्या संवेदनशील आहे. ७ ते १३ नोव्हेंबर व २ ते ८ डिसेंबर या कालावधीत नक्षल्यांनी बंदचे आवाहन केले होते. या कालावधीत नक्षल्यांकडून जाळपोळ करण्याच्या घटना घडत असल्याने कंत्राटदार या कालावधीत काम करण्यास तयार नव्हते. परिणामी १५ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील खड्डे बुजविण्याचे काम १०० टक्के पूर्ण होऊ शकले नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रदीप खवले यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना दिली.राष्ट्रीय महामार्गावरही खड्डेगडचिरोली जिल्ह्यातून जाणाºया प्रमुख चार मार्गांना केंद्र शासनाने राष्ट्रीय महामार्ग म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे या महामार्गाच्या देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आली आहे. मात्र याही विभागाचे मार्ग दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. नवीन मार्ग बांधण्यासाठी आणखी चार ते पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत या मार्गांची डागडुजी करणे आवश्यक आहे. धानोरा ते मुरूमगाव व पुढे छत्तीसगडपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गावरून छत्तीसगड राज्यातून अवजड वाहनांची नेहमी वर्दळ राहते. सिरोंचा तालुक्यातील सिरोंचा-अंकिसा-आसरअल्ली या मुख्य मार्गाची सुध्दा मोठी दुरवस्था झाली आहे. या मार्गाची दुरूस्ती करणे आवश्यक आहे.