लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अहेरी-आलापल्ली मार्गावरील प्राणहिता पोलीस मुख्यालयासमोर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक बसली. या धडकेत दोन युवक जागीच ठार झाले तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. सदर अपघात सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडला.गोपाल महतो (३१) रा. अहेरी व संतोष गट्टू दुडलवार (२५) रा. जिमलगट्टा अशी मृतकांची नावे आहेत. मल्लिकार्जुन वारला (२८) रा. रेगुंठा, विष्णू अंगावार रा. व्यंकटापूर व एक युवती अशी जखमींची नावे आहेत. गोपाल महतो हा अहेरी येथील जिल्हा उपजिल्हा रूग्णालयात कंत्राटी तत्वावर कार्यरत होता. तो युवतीसोबत एटापल्लीकडे जात होता. तर संतोष, मल्लिकार्जुन व विष्णू हे तिघे मित्र भामरागडवरून परीक्षा देऊन अहेरीकडे परत येत होते. त्यांच्या भरधाव दुचाकींची समोरासमोर जबर धडक बसली. या धडकेत दुचाकी चालविणारे गोपाल व संतोष हे जागीच ठार झाले. जखमींना तत्काळ अहेरी उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. त्यातील एकाला चंद्रपूर येथे हलविण्यात आले असल्याची माहिती आहे.
दुचाकींची समोरासमोर धडक दोन युवक ठार, तिघे गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 22:49 IST
अहेरी-आलापल्ली मार्गावरील प्राणहिता पोलीस मुख्यालयासमोर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक बसली. या धडकेत दोन युवक जागीच ठार झाले तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. सदर अपघात सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडला.
दुचाकींची समोरासमोर धडक दोन युवक ठार, तिघे गंभीर
ठळक मुद्देअहेरीजवळील अपघात : प्राणहिता मुख्यालयासमोरची घटना