लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: नक्षल्यांनी लावलेले बॅनर काढताना झालेल्या भूसुरुंग स्फोटात दोन पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. कोरची नगरपंचायत हद्दीपासून एक किमी अंतरावर असलेल्या पकनाभटी ते कोरचीच्या मध्यभागी रात्री नक्षलवाद्यांनी कापडी बॅनर लावले असल्याची माहिती पोलिस स्टेशन कोरची येथील अधिकाऱ्यांना मिळाली. पहाटे ५.३0 च्या सुमारास कोरची पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षण अतुल तवाडे व सहायक उपनिरिक्षक राजेश चावर मोटारसायकलने त्या ठिकाणी पोहोचले. रस्त्यालगत लावलेले ते बॅनर काढत असतानाच स्फोट झाला. त्यात एएसआय चावर गंभीर तर एपीआय तावाडे किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेनंतर तावाडे यांनी जखमी अवस्थेत चावर यांना मोटारसायकलवर बसवून उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. त्यानंतर गडचिरोलीवरून बोलविलेल्या हेलिकॉप्टरने दोघांनाही पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. सविस्तर वृत्त लवकरच देत आहोत. घटनास्थळी सरकारविरोधी आणि विशेषता महिला स्वातंत्र्यासंबंधी मजकूर असलेले पत्रके आढळली
गडचिरोलीत नक्षल्यांनी पेरलेल्या भुसुरुंग स्फोटात दोन पोलीस अधिकारी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 09:41 IST
नक्षल्यांनी लावलेले बॅनर काढताना झालेल्या भूसुरुंग स्फोटात दोन पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत.
गडचिरोलीत नक्षल्यांनी पेरलेल्या भुसुरुंग स्फोटात दोन पोलीस अधिकारी जखमी
ठळक मुद्दे हेलिकॉप्टरने हलविले नागपूरलानक्षल्यांचे बॅनर काढत असतानाची घटना