शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाखांचा सडवा जप्त, पोलीस, मुक्तीपथ व गाव संघटना पथकाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2018 20:32 IST

दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गाळली जात असलेल्या मोहफुलाच्या व काळ्या गुळाच्या दारूसाठी तयार केलेला दोन लाखांचा सडवा जप्त करून नष्ट करण्यात आला.

सिरोंचा (गडचिरोली) : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गाळली जात असलेल्या मोहफुलाच्या व काळ्या गुळाच्या दारूसाठी तयार केलेला दोन लाखांचा सडवा जप्त करून नष्ट करण्यात आला. ही कारवाई सिरोंचा तालुक्यातील नारायणपूरलगतच्या तीन गावांत सोमवारी करण्यात आली.सिरोंचापासून १० किलोमीटवर असलेल्या नारायणपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणा-या नारायणपूर, भोगापूर व कारसपट्टी या तीन गावांमध्ये पोलीस पथक, मुक्तीपथ अभियानाचे कार्यकर्ते आणि गाव संघटना पथकाने मिळून ही कारवाई केली. प्लास्टिकचे मोठे ड्रम आणि मातीच्या मडक्यांमध्ये भरून हा सडवा ठेवलेला होता. यावेळी ड्रममधील सडवा नष्ट करण्यात आला, तर मातीची मडकी फोडून टाकण्यात आली. घराच्या मागील बाजूने हे सर्व ड्रम तणसाने झाकून ठेवलेले होते. मुक्तीपथच्या कार्यकर्त्यांनी लपवून ठेवलेली दारू हुडकून काढण्यासाठी मदत केली. ज्या नागरिकांच्या घराच्या हद्दीत ही दारू ठेवलेली होती त्या चार जणांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. यातील तीन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले तर एक आरोपी महिला आजारी असल्यामुळे तिला अटक केली नाही. ही कारवाई सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत करण्यात आली.