शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

दोन अपघातात दोघे ठार, नऊ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:06 IST

चामोर्शी व धानोरा तालुक्यात मंगळवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघे जण ठार तर नऊ जण जखमी झाल्याची घटना घडली. चामोर्शी तालुक्यात वाघदरा-जयनगर गावाच्या दरम्यान चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने या अपघातातील एक जण जागीच ठार तर दुसऱ्याचा गडचिरोलीला नेताना मृत्यू झाला.

ठळक मुद्देगट्टानजीक प्रवाशी वाहन उलटले : वाघदरा-जयनगर दरम्यान चारचाकीची दुचाकीला धडक

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी/धानोरा : चामोर्शी व धानोरा तालुक्यात मंगळवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघे जण ठार तर नऊ जण जखमी झाल्याची घटना घडली. चामोर्शी तालुक्यात वाघदरा-जयनगर गावाच्या दरम्यान चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने या अपघातातील एक जण जागीच ठार तर दुसऱ्याचा गडचिरोलीला नेताना मृत्यू झाला. पेंढरी-गट्टा मार्गावर प्रवासी वाहन उलटल्याने यात आठ प्रवासी जखमी झाले.निमरड टोला येथील यादव नागोजी शिंदे, मोहन नागोजी शिंदे व रूपेश राऊत हे तिघे जण एमएच ३३ पी ६१८१ क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने चामोर्शी तालुक्याच्या गणपूर येथे मंगळवारी लग्नाला गेले होते. सदर लग्नकार्य आटोपून निमरडटोलासाठी बोरी गावाकडून चामोर्शीकडे येत असताना वाघदरा-जयनगर गावाच्या दरम्यान एमएच ३४ एए ५७१७ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने या दुचाकीला धडक दिली. यात यादव नागोजी शिंदे (३२) रा. निमरड टोला हा जागीच ठार झाला. तर गंभीर जखमी झालेला मोहन नागोजी शिंदे याला गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. मृतक दोघेही सख्खे भाऊ आहेत. तर या अपघातात जखमी झालेला रूपेश राऊत मृतकांचा मेहुणा आहे. चारचाकी वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला. त्याचा शोध घेऊन त्याला पकडण्यासाठी चामोर्शी पोलिसांनी कसोसीचे प्रयत्न केले. वाहन चालक धनराज दिगांबर वन्नेवार (३६) रा. रामसागर याला अटक केली. त्याच्या विरूध्द भादंविचे कलम ३०४ (अ), ३३७, ३३८, सहकलम १८४, १३४ (अ), १८५ (१) अन्वये गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरिक्षक गोरख गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक मल्हार थोरात, पोलीस हवालदार दुलाल मंडल व सुनील हजारे करीत आहेत. एकाच कुटुंबातील दोन भावांचा मृत्यू झाल्याने निमरड टोला गावावर शोककळा पसरली आहे.धानोरा तालुक्याच्या पेंढरी - गट्टा मार्गावर एका प्रवासी वाहनाचा अपघात झाल्याने वाहनातून प्रवास करणारे आठ प्रवासी जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. एमएच ३३ ए १२०५ क्रमांकाच्या प्रवासी वाहनामध्ये अचानक बिघाड आला. वाहन भरधाव असताना बिघाड निर्माण झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे वाहन रस्त्यावरच उलटले. यामध्ये प्रवासी जखमी झाले. जखमींना पेंढरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र अपुºया सोयीअभावी त्यांना गडचिरोलीच्या जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

टॅग्स :Accidentअपघात