शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार, १२ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 23:17 IST

आलापल्ली-वेलगूर मार्गावरील रामय्यापेठा गावाजवळ झालेल्या अपघातात एक ठार आणि दोन जण जखमी तर मुलचेरा तालुक्यातील तुमरगुंडा ते दामपूर दरम्यानच्या वळणावर झालेल्या अपघातात एक वृध्द इसम ठार झाला आहे. तर कुरखेडा तालुक्यात झालेल्या अपघातामध्ये १० जण जखमी झाले.

ठळक मुद्देरूग्णालयात भरती : रामय्यापेठा, तुमरगुंडा, वासी, कुरखेडा जवळ अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली/मुलचेरा/कुरखेडा : आलापल्ली-वेलगूर मार्गावरील रामय्यापेठा गावाजवळ झालेल्या अपघातात एक ठार आणि दोन जण जखमी तर मुलचेरा तालुक्यातील तुमरगुंडा ते दामपूर दरम्यानच्या वळणावर झालेल्या अपघातात एक वृध्द इसम ठार झाला आहे. तर कुरखेडा तालुक्यात झालेल्या अपघातामध्ये १० जण जखमी झाले.विक्रम मधुकर आत्राम (२५) रा. आलापल्ली व बिपीन बिजेंद्र हलदार (७०) रा. शांतीग्राम अशी मृतांची नावे आहेत. करण आत्राम (२४) व संतोष वेलादी (२५) दोघेही रा.आलापल्ली हे युवक जखमी झाले आहेत.प्राप्त माहितीनुसार, आलापल्ली येथील करण तुळशीराम आत्राम, विक्रम आत्राम, संतोष चुक्का वेलादी हे तीन युवक एकाच दुचाकीवर बसून आलापल्लीकडे रविवारी रात्री ८ वाजता येत होते. दरम्यान रामय्यापेठा गावाजवळ ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार विक्रम मधुकर आत्राम हा जागीच ठार झाला. तर करण आत्राम व संतोष वेलादी हे जखमी झाले. जखमींना अहेरी उपजिल्हा रूग्णालयात भरती करण्यात आले.घटनेची माहिती मिळाल्यानंतर जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार, माजी आमदार दीपक आत्राम, जि.प. सदस्य अनिता आत्राम यांनी दवाखान्यात जाऊन जखमींची भेट घेतली. हे सुध्दा रूग्णालयात पोहोचले. विक्रम आत्राम हा माजी आमदार दीपक आत्राम यांचा पुतन्या आहे. विक्रमच्या पश्चात आई-वडील एक भाऊ व एक बहिण आहे. मृतकाचे वडील मधुकर मल्लाजी आत्राम यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल केला आहे. ट्रॅक्टरचा शोध पोलीस घेत आहेत. संतोष व करण यांना गडचिरोली रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.मुलचेरा तालुक्यातील तुमरगुंडा ते दामपूर मार्गावरील वळणावर सोमवारी सकाळच्या सुमारास शेतात जात असलेल्या बिपीन बिजेंद्र हलदर (७०) रा. शांतीग्राम या वृध्द इसमाला एका अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत हलदार यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील रूग्णालयात हलविण्यात आले आहे.वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटलाकुरखेडा : लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने आठ जण जखमी झाल्याची घटना कुरखेडा तालुक्यातील वासी गावाजवळच्या वळणावर सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. भगवानपूर येथील काटेंगे परिवाराकडे लग्न होते. लग्नकार्य आटोपून वरात ट्रॅक्टरने धानोरा तालुक्यातील गट्टेपायलीकडे परत जात होती. वासी गावाजवळ ट्रॅक्टर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजुला जाऊन उलटले. या अपघातात धानू आतला (४८), मधुकर मडावी (७५), वासुदेव बोगा (३८), सोमा दुगा (४३), नानू बोगा (३७), चेंडू हलामी (५५) सर्व रा. गॅरापत्ती अशी जखमींची नावे आहेत. याच ट्रॅक्टरमध्ये कढोली येथील आठवडी बाजार आटोपून वासी येथे परत जाणाºया सुरेखा पुराम (३०), यशोदा पुराम (४०) या सुध्दा जखमी झाल्या. या सर्वांना कुरखेडा येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.दुचाकी अपघातात दोघे गंभीरकुरखेडा : कुरखेडा-पुराडा मार्गावरील लेंढारी नाल्याजवळ दुचाकीला अपघात होऊन एक महिला व एक पुरूष जखमी झाले. दोघांनाही गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे. कुरखेडा येथील दिलीप संघेल (५५), मैनाबाई पुळो (५०) हे दोघेही कुरखेडा येथून लग्न समारंभाकरिता लेंढारीकडे जात होते. १५ पोलीस शहीद झालेल्या लेंढारी नाल्यावरच असलेल्या गिट्टीच्या ढिगावरून दुचाकी घसरली. यामुळे दोघेही जमिनीवर कोसळले. दोघांनाही मार लागला. १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका बोलवून दोघांनाही सर्वप्रथम उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गडचिरोली जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे.