ऑनलाईन लोकमतगडचिरोली : तालुक्यातील साखरा येथील दोन घरांना आग लागल्याने दोन्ही घरे जळून खाक झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.भास्कर डोईजड व पांडुरंग डोईजड असे घर मालकांचे नाव आहे. सकाळी पुजेसाठी लावलेल्या दिव्याची जळती वात सुसूंद्रीने कपड्यांमध्ये नेऊन टाकली. यामुळे सुरूवातीला कपड्यांना आग लागली. आगीची घटना घडली. त्यावेळी घरात कोणीही नव्हते. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर आगीचे डोंब घरातून निघायला लागले. त्यामुळे आग लागल्याचे लक्षात आले. गावकºयांनी गडचिरोली येथील अग्नीशमन दलाला बोलविले. अग्नीशमन दल पोहोचेपर्यंत घरातील सर्वच वस्तू जळून खाक झाल्या होत्या. याबाबतचा पंचनामा तलाठ्यांनी केला आहे. दोन्ही घरांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.भास्कर डोईजड व पांडुरंग डोईजड हे दोघेही गरीब असल्याने तहसीलदारांनी या दोघांनाही तत्काळ आर्थिक मदत द्यावी, त्याचबरोबर घरकूल योजनेतून घर तत्काळ बांधून द्यावी, अशी मागणी होत आहे.
साखरा येथील दोन घरे जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 23:27 IST
तालुक्यातील साखरा येथील दोन घरांना आग लागल्याने दोन्ही घरे जळून खाक झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
साखरा येथील दोन घरे जळून खाक
ठळक मुद्देजीवितहानी टळली : लाखोंचे नुकसान