शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

दोन जहाल महिला माओवाद्यांचे आत्मसमर्पण; पुनर्वसनासाठी मिळतील लाखो रुपये

By संजय तिपाले | Updated: January 8, 2025 17:36 IST

दहा लाखांचे होते बक्षीस : दोघींवर ५३ गुन्ह्यांची नोंद, नक्षल्यांना आठवड्यातच दुसरा धक्का

गडचिरोली :  नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर  वरिष्ठ कॅडरमधील ११ जहाल माओवाद्यांनी शस्त्र खाली ठेऊन संविधानाचा मार्ग निवडला होता. यानंतर माओवाद्यांना दुसरा जबर धक्का बसला आहे. ८ जानेवारीला आणखी दोन जहाल महिला माओवाद्यांनी शस्त्र म्यान करुन शरणागती पत्कारली. कंपनी क्र. १० ची सेक्शन कमांडर शामला झुरु पुडो उर्फ लीला (३६,रा. गट्टेपल्ली ता. एटापल्ली) व भामरागड दलम सदस्य  काजल मंगरु वड्डे उर्फ लिम्मी (२४,रा. नेलगुंडा) अशी त्यांची नावे आहेत. या दोघींवर मिळून तब्बल ५३ गुन्हे नोंद आहेत.

शामल पुडोवर महाराष्ट्र सरकारचे ८ लाखांचे तर काजल वड्डेवर दोन लाखांचे बक्षीस जाहीर झालेले होते. आत्मसमर्पणानंतर केंद्र व राज्य सरकारकडून या दोघींना पुनर्वसनासाठी अनुक्रमे साडेपाच लाख व साडेचार लाख रुपये असे बक्षीस मिळणार आहे. १ जानेवारीला जहाल माओवादी नेता व केंद्रीय समिती सदस्य भूपती याची पत्नी विमला चंद्रा सिडाम उर्फ तारा उर्फ वत्सला उर्फ ताराक्का हिच्यासह ११ जहाल नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले होते. २०२२ पासून आतापर्यंत एकूण ४६ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले.

नक्षलविरोधी अभियानचे पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, राज्य राखीव दलाचे उपमहानिरीक्षक (अभियान) अजय कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक  नीलोत्पल, राज्य राखीव दलाच्या  ११३ बटालियनचे कमांडंट  जसवीर सिंग  यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पण मोहीम सुरु आहे.

शामला होती २२ वर्षांपासून सक्रियशामला पुढे ही २३ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या माओवादी चकमकीत मारल्या गेलेल्या दंडकारण्य स्पेशल झोन कमिटी सदस्या रुपेश मडावी ऊर्फ सांबा याची पत्नी आहे. २००२ मध्ये ती चामोर्शी दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाली.  पुढे २००७ पर्यंत तिने प्लाटून क्र. ७ मध्ये काम केले. २००७ मध्ये तिची बदली कंपनी क्र. ४ मध्ये झाली. २००८ मध्ये ती पीपीसीएम पदावर पदोन्नती घेऊन सेक्शन कमांडर म्हणून कंपनी क्र. ४ मध्ये आली. २०१०  मध्ये तिची कंपनी क्र. १० मध्ये बदली झाली. तेव्हापासून ती सेक्शन कमांडर या पदावर कार्यरत होती.  तिच्यावर ४५ गुन्हे नोंद असून यात २१ चकमक, ६ जाळपोळ व इतर १८ गुन्ह्यांचा समावेश आहे.        काजलवर आठ गुन्ह्यांची नोंद काजल मंगरु वड्डे ही जानेवारी २०१८ मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाली. याच दलममध्ये ती आतापर्यंत कार्यरत होती. कारकीर्दीत तिने ८ गुन्हे केले. यात ४ चकमक, १ जाळपोळ व ३ इतर गुन्ह्यांचा समावेश आहे.  

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली