शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

सिंदेवाहीत शेतकऱ्याचा बळी घेणाऱ्या दोन हत्तीचे 'कमबॅक'; वैरागडात धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 18:08 IST

परिसरात भीतीचे वातावरण : वनविभागाकडून प्रत्येक हालचालींवर नजर; हुल्ला टीमही सक्रिय, घ्या खबरदारी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत येरझाऱ्या घालणारे दोन टस्कर हत्ती पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात परतले आहेत. या हत्तींनी रविवारी चंद्रपूर जिल्ह्यातील एका व्यक्तीची हत्या केली. त्यामुळे नागरिक व शेतकरी यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर हत्तींनी सोमवारी आरमोरी तालुक्यातील वैरागड परिसरातील शेतीचे नुकसान केले आहे.

मागील तीन वर्षांपासून जवळपास ३० हत्तींचा कळप जिल्ह्यात फिरत आहे. हा कळप शेतीचे मोठे नुकसान करीत आहे. सदर कळपही चंद्रपूर जिल्ह्यात दोन ते तीन वेळा गेला. मात्र तो काही दिवसांतच परत येत आहे. हत्तींच्या कळपामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. अशातच दुसऱ्या कळपातील पुन्हा दोन टस्कर हत्ती मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात धुमाकूळ घालत आहेत. सदर हत्ती मोठ्या प्रमाणात फिरत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी अनेक गावांमध्ये प्रवेश केला. त्याचे व्हिडीओ जिल्हाभरात व्हायरल झाले. मात्र या हत्तींनी कोणालाही हानी पोहोचवली नव्हती. मात्र रविवारी या हत्तींनी सिंदेवाही तालुक्यातील जाटलापूर येथील एका व्यक्तीला ठार केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हत्ती पुन्हा जिल्ह्यात पोहोचले आहेत. सध्या वैरागड-कराडी या जंगल परिसरात टस्कर हत्तींचा वावर आहे. नागरिकांनी विनाकारण जंगलात प्रवेश करू नये. गावात हत्ती आल्यास त्यांचा पाठलाग करू नये. त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

शौचास बसलेला वृध्द हत्ती बघून धावताना जखमीआरमोरी तालुक्यातील देऊळगाव येथील बाबूराव मदा निमकर (७६) हे मंगळवारी सकाळी सहा वाजता गावाबाहेर शौचास गेले होते. शेतातून दोन टस्कर हत्ती येत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी तेथून गावाकडे धाव घेतली, असता ते तोल गेल्याने जमिनीवर कोसळले. त्यांच्या पाय व हाताला जखम झाली आहे. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. आरमोरीचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी धोंडने यांनी रुग्णालयात जाऊन जखमीची भेट घेतली. बाबूराव निमकर यांना वनविभागाने मदत द्यावी, अशी मागणी गावातील नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे. 

पन्ह्यांचे अतोनात नुकसानसोमवारी रात्री या हत्तींनी वैरागड परिसरातील शेतीचे नुकसान केले. शेतकऱ्यांनी धानाचे पन्हें टाकले आहेत. सध्या पन्हे अतिशय लहान आहेत. हत्तींनी पन्हे पायदळी तुडवले. वैरागड येथील विश्वनाथ खंडारकर, अजय सोमनकर, सुधाकर बनकर, राकेश सोमनकर, अरुण बनकर यांच्या शेतातील धान पयांचे नुकसान केले आहे. वासाळा-वैरागड रस्ता ओलांडताना हत्ती अनेकांच्या दृष्टीस पडले.

२५ हजार यावर्षीचा खरीप हंगामही हत्तींमुळे धोक्यातरुपये एकरी मदत देण्याची मागणी होत आहे. मागील वर्षी धान उत्पादक शेतकऱ्यांना वन विभागाने अतिशय कमी मदत दिली असा, आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली