शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या खात्यात दोन कोटींचा बोनस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 21:59 IST

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत धान खरेदी केली जाते. आविका संस्थांच्या केंद्रांवर धानाची विक्री केलेल्या एकूण ३ हजार ७३८ शेतकऱ्यांना प्रती क्विंटल २०० रूपये प्रमाणे आतापर्यंत एकूण २ कोटी ९ लाख ६७ हजार ३४० रूपयांचा बोनस........

ठळक मुद्दे३ हजार ७३८ शेतकऱ्यांना मिळाला लाभ : खरीप व रबी हंगाम मिळून ५ लाख ८३ हजार क्विंटल धान खरेदी

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत धान खरेदी केली जाते. आविका संस्थांच्या केंद्रांवर धानाची विक्री केलेल्या एकूण ३ हजार ७३८ शेतकऱ्यांना प्रती क्विंटल २०० रूपये प्रमाणे आतापर्यंत एकूण २ कोटी ९ लाख ६७ हजार ३४० रूपयांचा बोनस वितरित करण्यात आला आहे.आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ३ हजार ५० शेतकऱ्यांना १ कोटी ७४ लाख ६० हजार १८० रूपये बोनसच्या स्वरूपात अदा करण्यात आल्या आहे. या शेतकऱ्यांचे एकूण ८७ हजार ३०० क्विंटल धान बोनस देयकासाठी पात्र झाले आहेत. शासनाच्या नियमानुसार आदिवासी विकास महामंडळातर्फे खरीप हंगामात धानाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना ५० क्विंटल मर्यादेच्या आत २०० रूपये प्रती क्विंटल नुसार बोनस वितरित केला जातो. अहेरी कार्यालयाच्या वतीने ६८८ शेतकऱ्यांना ३५ लाख ७ हजार १६० रूपये बोनसच्या स्वरूपात आतापर्यंत अदा करण्यात आले आहे. गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत सन २०१७-१८ च्या खरीप हंगामात ३ लाख ६८ हजार ६१० व रबी हंगामात ४० हजार ८०९ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. अहेरी कार्यालयांतर्गत असलेल्या केंद्रांवरून खरीप हंगामात १ लाख ३८ हजार २६ क्विंटल तर रबी हंगामात ३६ हजार ३४७ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. गडचिरोली व अहेरी दोन्ही कार्यालयातील मिळून जवळपास ९० वर केंद्रावर एकूण २२ हजार ३५६ शेतकऱ्यांनी ५ लाख ८३ हजार ७९३ क्विंटल धानाची विक्री केली.खरीप व रबी हंगामात धान विक्री केलेल्या सर्व शेतकऱ्यांना अहेरी कार्यालयामार्फत धान चुकाऱ्याची रक्कम अदा करण्यात आली आहे. गडचिरोली कार्यालयामार्फत दोन शेतकरी वगळता इतर सर्वाची धान चुकाऱ्यांची रक्कम थेट खात्यात जमा केली आहे. केवळ दोन शेतकऱ्यांची ७३ हजार इतकी धान चुकाऱ्याची रक्कम प्रलंबित आहे.बँक खाते व आधार पडताळणीस गतीमहामंडळाच्या कार्यालयामार्फत संपूर्ण जिल्हाभरात खरीप हंगामात धानाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना एकुण २ कोटी ९ लाख रूपयांचा बोनस वितरित करण्यात आला आहे. उर्वरित शेतकऱ्यांचे बँक खाते व आधार क्रमांकाच्या पडताळणीची कार्यवाही गतीने सुरू आहे. जिल्हाभरात सर्व संस्थांमार्फत ५० क्विंटल मर्यादेच्या आत धानाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांची यादी त्यांचे आधार व बँक खाते क्रमांक महामंडळाच्या कार्यालयाने मागितले आहेत. काही संस्थांकडून बोनससाठीची शेतकऱ्यांची यादी विलंबाने प्राप्त झाली. त्यामुळे काही शेतकऱ्यांना बोनस देणे शिल्लक आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी