शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

देसाईगंजात दोन कन्टेंमेंट झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 05:01 IST

गांधी नगर येथील पूर्वेस रावजी मेश्राम यांचे घर, पश्चिमेला चक्रधर बनकर यांचे घर, उत्तरेला गुलाम आदी यांचे घर तर पश्चिमेला जिल्हा परिषदेच्या शाळेपर्यंतचा परिसर कन्टेंमेंट झोन म्हणून घोषित केले आहे. देसाईगंज येथे नवीन एसआरपीएफची बटालियन आली. या सर्वांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यापैकी एका जवानाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. उर्वरित सर्व जवानांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सर्व एसआरपीएफ जवानांना १४ दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले होते.

ठळक मुद्देखबरदारीचा उपाय : एकाच दिवशी आढळले होते पाच पॉझिटिव्ह कोरोना रूग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : देसाईगंज येथे शनिवारी एकाच दिवशी पाच कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने देसाईगंज शहरातील रेल्वे परिसर, गांधी नगराचा काही भाग कन्टेंमेंट झोन तर गांधीनगरचाच काही भाग बफर झोन म्हणून घोषित केला आहे.देसाईगंज तालुक्यातील वेगवेगळ्या संस्थात्मक विलगीकरणात असलेला एक एसआरपीएफ जवान व इतर चार नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी मौजा विर्शीतुकूम अंतर्गत येणारा रेल्वे कॉलनीमधील रेल्वेस्टेशनचे प्रवेशद्वार, पुर्वेस वैनगंगा रेल्वे कॉलनी, दक्षिणेच रेल्वे प्लॅटफार्म तर पश्चिमेला रेल्वे तिकीट घरापर्यंतचा भाग कन्टेंमेंट झोन म्हणून घोषित केले आहे.गांधी नगर येथील पूर्वेस रावजी मेश्राम यांचे घर, पश्चिमेला चक्रधर बनकर यांचे घर, उत्तरेला गुलाम आदी यांचे घर तर पश्चिमेला जिल्हा परिषदेच्या शाळेपर्यंतचा परिसर कन्टेंमेंट झोन म्हणून घोषित केले आहे. देसाईगंज येथे नवीन एसआरपीएफची बटालियन आली. या सर्वांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यापैकी एका जवानाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. उर्वरित सर्व जवानांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सर्व एसआरपीएफ जवानांना १४ दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले होते. दोन महिला नागपूरवरून देसाईगंज येथे आल्यानंतर त्यांना विलगीकरणात ठेवले होते. त्यापैकी एक महिला एक दिवस घरी राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी विलगीकरणात हलविले होते. या महिलेच्या संपर्कात आलेल्या तीव्र जोखमीच्या सर्व व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.रूग्णाला घेऊन येणाºयाला केले क्वॉरंटाईनआष्टी : पालघर जिल्ह्यातून आलेला एक युवक संस्थात्मक विलगीकरणात असताना कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. आरोग्य विभागाने त्याच्या प्रवासाची चौकशी केली असता, त्याने पालघर ते चंद्रपूरपर्यंत ट्रॅव्हल्सने प्रवास केला. ज्या ट्रॅव्हल्सने संबंधित रूग्णाने प्रवास केला, त्या वाहनचालकाला आरोग्य विभागाने क्वॉरंटाईन केले आहे. विशेष म्हणजे, सदर चालक हा आष्टी येथीलच आहे. तो तीन दिवस बाहेर फिरला. त्यामुळे त्याचा अनेकांशी संपर्क आला आहे. तो कोणाकोणाच्या संपर्कात आला याचा शोध आरोग्य विभागामार्फत घेतला जात आहे.गोकुलनगरात प्रतिबंधीत क्षेत्रगडचिरोली शहरातील गोकुलनगर येथील एक नागरिक गडचिरोली येथीलच एका खासगी दवाखाण्यात उपचार घेत होता. त्याला नागपूर येथे हलविले असता, तो कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. सदर रूग्ण गोकुलनगरातील रहिवाशी आहे. त्यामुळे गोकुलनगराचा काही भाग प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. तसेच गडचिरो येथील ज्या रूग्णालयात तो उपचार घेत होता, त्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना रूग्णालयातच क्वॉरंटाईन करण्यात आले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या