शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

दोन लाखांच्या दारूसह वाहतूक करणारी कार जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 20:44 IST

कारमधून २ लाख रुपयांची दारू अनधिकृतपणे वाहतूक करणा-या दोन आरोपींना देसाईगंज पोलिसांनी अटक केली.

गडचिरोली : कारमधून २ लाख रुपयांची दारू अनधिकृतपणे वाहतूक करणा-या दोन आरोपींना देसाईगंज पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडील कारसह २ लाख १० हजार रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली आहे. ही दारू लाखांदूरमार्गे आरमोरीकडे जाताना देसाईगंजजवळ ही कारवाई करण्यात आली.प्राप्त माहितीनुसार, एका आकाशी रंगाच्या कारमधून दारूची वाहतूक होत असल्याची माहिती शनिवारी (दि. ७) सायंकाळी पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवन, देसाईगंजचे पोलीस निरीक्षक प्रदीप लांडे, उपनिरीक्षक हर्षल नगरकर यांनी आरमोरी मार्गावरील निरंकारी भवनाजवळ सापळा रचला. नायक विजय नंदेश्वर, गुरूदेव चौधरी, संतोष नागरे व चालक शंकर बंडे हे पाळत ठेवून असताना एमएच ४३, व्ही ९१२७ हे वाहन आरमोरीकडे जाताना दिसले.त्या वाहनास थांबवून तपासले असता देशी दारूच्या ३५०० प्लास्टिक सिलबंद बाटल्या सापडल्या. ही २ लाख १० रुपयांची दारू आणि ३ लाख किमतीची कार असा ५ लाख १० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही दारू नागपूरवरून आली असून ती चंद्रपूरकडे जात असल्याचे देसाईगंज पोलिसांनी सांगितले. यातील आरोपी संदीप रामू हेडाऊ, रा.धांदला, जि.नागपूर आणि राजेश गणेश रायकवार, रा.कामाक्षीनगर, नागपूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.