शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाखांच्या दारूसह वाहतूक करणारी कार जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 06:00 IST

प्राप्त माहितीनुसार, एका आकाशी रंगाच्या कारमधून दारूची वाहतूक होत असल्याची माहिती शनिवारी (दि.७) सायंकाळी पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवन, देसाईगंजचे पोलीस निरीक्षक प्रदीप लांडे, उपनिरीक्षक हर्षल नगरकर यांनी आरमोरी मार्गावरील निरंकारी भवनाजवळ सापळा रचला.

ठळक मुद्देदेसाईगंजमधील कारवाई । नागपूरवरून चंद्रपूरकडे जात होती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कारमधून २ लाख रुपयांची दारू अनधिकृतपणे वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना देसाईंज पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडील कारसह २ लाख १० हजार रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली आहे. ही दारू लाखांदूरमार्गे आरमोरीकडे जाताना देसाईगंजजवळ ही कारवाई करण्यात आली.प्राप्त माहितीनुसार, एका आकाशी रंगाच्या कारमधून दारूची वाहतूक होत असल्याची माहिती शनिवारी (दि.७) सायंकाळी पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवन, देसाईगंजचे पोलीस निरीक्षक प्रदीप लांडे, उपनिरीक्षक हर्षल नगरकर यांनी आरमोरी मार्गावरील निरंकारी भवनाजवळ सापळा रचला. नायक विजय नंदेश्वर, गुरूदेव चौधरी, संतोष नागरे, रुपाली बावनकर व चालक शंकर बंडे हे पाळत ठेवून असताना एमएच ४३, व्ही ९१२७ हे वाहन आरमोरीकडे जाताना दिसले. त्या वाहनास थांबवून तपासले असता देशी दारूच्या ३५०० प्लास्टिक सिलबंद बाटल्या सापडल्या. ही २ लाख १० रुपयांची दारू आणि ३ लाख किमतीची कार असा ५ लाख १० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही दारू नागपूरवरून आली असून ती चंद्रपूरकडे जात असल्याचे देसाईगंज पोलिसांनी सांगितले. यातील आरोपी संदीप रामू हेडाऊ, रा.धांदला, जि.नागपूर आणि राजेश गणेश रायकवार, रा.कामाक्षीनगर, नागपूर यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

टॅग्स :liquor banदारूबंदी